spot_img
spot_img

💥दुःखद बातमी! बुलढाण्याचे माजी उपाध्यक्ष बाबासाहेब महाजन काळाच्या पडद्याआड

बुलढाणा (हॅलो बुलडाणा) शहरातील प्रतिष्ठित व्यक्तिमत्त्व, समाजकारण आणि शैक्षणिक क्षेत्रात मोठे योगदान देणारे बुलढाणा एज्युकेशन सोसायटीचे माजी सचिव व उपाध्यक्ष तसेच बुलढाणा नगरपालिकेचे माजी उपाध्यक्ष कै. बाबासाहेब महाजन यांचे गुरुवार, दि. ५ मार्च २०२६ रोजी रात्री ११:२० वाजता अल्पशा आजाराने दुःखद निधन झाले. त्यांच्या निधनाने बुलढाणा शहरात हळहळ व्यक्त होत असून सामाजिक, शैक्षणिक व राजकीय क्षेत्रातील अनेकांनी शोक व्यक्त केला आहे.

कै. बाबासाहेब महाजन यांनी बुलढाणा शहराच्या विकासासाठी तसेच शिक्षण क्षेत्राच्या उन्नतीसाठी महत्त्वपूर्ण कार्य केले होते. बुलढाणा एज्युकेशन सोसायटीच्या माध्यमातून त्यांनी अनेक उपक्रम राबवून विद्यार्थ्यांना प्रोत्साहन देण्याचे काम केले. नगरपालिकेचे उपाध्यक्ष म्हणूनही त्यांनी विविध विकासकामांमध्ये सक्रिय भूमिका बजावली होती. त्यांच्या साध्या, मनमिळाऊ स्वभावामुळे ते सर्वांच्या परिचयाचे व आदराचे व्यक्तिमत्त्व होते.

त्यांच्या पश्चात कुटुंबीय, नातेवाईक व मोठा मित्रपरिवार असा आप्तपरिवार आहे. ते ॲड. तुषार महाजन यांचे वडील होत.

कै. बाबासाहेब महाजन यांचा अंत्यविधी आज शुक्रवार, दि. ६ मार्च २०२६ रोजी सकाळी ११:०० वाजता साखळी बुद्रुक येथे त्यांच्या शेतात करण्यात येणार आहे. त्यांच्या निधनाने परिसरात शोककळा पसरली आहे. त्यांच्या स्मृतीस भावपूर्ण श्रद्धांजली व्यक्त करण्यात येत आहे.

spot_img

Related Articles

लोकप्रिय

error: Content is protected !!