मलकापूर (हॅलो बुलढाणा) विनाफलकाच्या काही एसटी गाड्या मलकापूर बसस्थानकावर उभे राहतात. याचा प्रवाशांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. काही गाडीवर चून्याने लिहिलेल्या पाट्या पाहून प्रवासी बुचकळ्यात पडत आहे. ‘हात दाखवा गाडी थांबवा’ हे वाहन चालक कधीच विसरले आहेत. त्यामुळे आगार प्रमुखांनी योग्य गावाचे फलक लावावे.. विना फलकाच्या गाडी घेऊन जाणाऱ्या चालकावर कारवाईचा बडगा उगारवा,अशी जोरदारवल मागणी होत आहे.
मलकापूर येथे चालकांकडून फलक न लावताच एस. टी. बस बाहेर पडते. प्रवाशांनी बस कुठे जात आहे याची विचारणा केल्यास चालक सांगण्यास तयार नसतो.
तसे पाहिले तर,राज्य परिवहन महामंडळाची बस ही शहर आणि ग्रामीण भागात सर्वत्र आहे. परंतु आता काळाप्रमाणे एसटी बदलत आहे. नवनवीन बदल एसटीत केले जात आहेत. आता एसटी कुठे आहे, हे समजणार आहे.
सर्वसामान्य प्रवासी एसटीने प्रवास करतात. लाखो व्यक्ती रोज एसटी बसमधून प्रवास करत असतात. एसटीमधून प्रवास करणाऱ्यांना महिला प्रवाशांना अर्ध्या तिकीटात प्रवास करता येते. वरिष्ठ नागरिकांनाही अर्ध्या तिकीटात प्रवास करण्याची सवलत आहे. तसेच ७० वर्षांवरील ज्येष्ठ नागरिकांना मोफत प्रवास करण्याची सवलत दिली जाते. यामुळे एसटीने प्रवास करणाऱ्यांची संख्या वाढत आहे. एसटी कुठे आहे, समजणार आहे. त्यासाठी एसटी महामंडळाने सर्व बसेसला व्हेईकल ट्रॅकींग सिस्टीम बसवली आहे. परंतु बुलढाणा आगारात आणि मलकापूर बस स्थानकावर प्रवाशाची कुचंबना अजूनही थांबलेली नाही. बुलढाणा आगार प्रमुखांनी याकडे लक्ष वेधावे,अन्यथा अधिकाऱ्यांना आंदोलनाचा सामना करावा लागेल ,असा इशारा मलकापूर येथील संतप्त प्रवाशांनी दिला आहे.