spot_img
spot_img

कमावता हात निघून गेला; चार महिन्यांच्या चिमुकलीवर पित्याची सावली हरपली

मोताळा (हॅलो बुलडाणा) तालुक्यातील भोरटेक येथे अत्यंत हृदयद्रावक घटना घडली आहे. येथील महादेव भानुदास गवळी (वय ३५) यांचा काल सायंकाळी सुमारे ७ वाजण्याच्या सुमारास विजेचा जबर धक्का लागून दुर्दैवी मृत्यू झाला. अचानक घडलेल्या या घटनेमुळे संपूर्ण गावावर शोककळा पसरली असून सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे. कुटुंबाचा आधारस्तंभ असलेले महादेव गवळी यांच्या अकाली जाण्याने गवळी कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.

महादेव गवळी यांच्या पश्चात आई-वडील, पत्नी, दोन लहान मुले आणि अवघ्या चार महिन्यांची चिमुकली मुलगी असा मोठा परिवार आहे. कुटुंबातील कमावता व्यक्ती अचानक निघून गेल्याने त्यांच्या घरातील प्रत्येक सदस्यावर शोकाचा आघात झाला आहे. गावकऱ्यांनीही या घटनेबद्दल तीव्र दुःख व्यक्त करत कुटुंबाला धीर देण्याचा प्रयत्न केला.

spot_img

Related Articles

लोकप्रिय

error: Content is protected !!