बुलढाणा (हॅलो बुलढाणा) मुंबईतही पाऊस एवढा बरसला की, चक्क ट्रेन थांबल्या आहेत. त्यामुळे आमदार संजय गायकवाड यांच्यासह अनेक आमदार ट्रेनमध्ये अडकले आहेत.
मुंबईसह उपनगरात मुसळधार पाऊस कोसळत आहे. लोकल सेवा विस्कळीत झाली आहे. तर सखल भागात पाणी साचल्याने रस्ते वाहतूकही ठप्प झाल्याचे पाहायला मिळत आहे. तर मुंबईतल्या मुसळधार पावसाचा फटका अधिवेशनात जाणाऱ्या अनेक आमदारांनाही बसला आहे. कॅबिनेट मंत्री अनिल पाटील यांचाही समावेश. रेल्वे ट्रॅकवर पाणी भरल्यामुळे कुर्ला हावडा मेल मागच्या दोन तासापासून अडकले आहे.या मध्ये आ. संजय गायकवाड, आ. अमोल मिटकरी, आ. जोगेंद्र कवाडे, कॅबिनेट मंत्री अनिल पाटील, आमदार धीरज लिंगाडे आणि इतर आमदार हावडा मेलमध्ये अडकले असल्याची माहिती सूत्रांनी दिली.