spot_img
spot_img

BIG NEWS खामगावच्या राहुडमध्ये थरकाप उडवणारी घटना! सख्ख्या भावाचाच निर्घृण खून; जाळून राख नदीत फेकल्याची कबुली

खामगाव (हॅलो बुलडाणा) तालुक्यातील राहुड गावात नात्यांना काळिमा फासणारी संतापजनक आणि अंगावर काटा आणणारी घटना उघडकीस आली आहे. सख्ख्या भावाचा डोक्यात लोखंडी रॉडने प्राणघातक वार करून खून केल्यानंतर त्याचा मृतदेह जाळून राख नदीत फेकल्याची धक्कादायक कबुली आरोपीने स्वतः दिल्याने परिसरात खळबळ उडाली आहे.

याप्रकरणी पिंपळगाव राजा पोलीस स्टेशन येथे अप क्रमांक 47/2026 अन्वये भारतीय न्याय संहिता 2023 च्या कलम 103(1), 238 व 3(5) अंतर्गत गंभीर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

या प्रकरणातील मृतक चेतन संजय इंगळे (वय 35, रा. राहुड) असल्याची माहिती समोर आली आहे. तर आरोपी म्हणून रोशन संजय इंगळे (वय अंदाजे 36, रा. राहुड) आणि रवि देविदास राऊत (वय अंदाजे 36, रा. महाकाल चौक, खामगाव) यांची नावे पुढे आली आहेत.

घटना दिनांक 25 फेब्रुवारी 2026 रोजी दुपारी साडेएक वाजताच्या सुमारास मृतक व आरोपी यांच्या शेतात घडल्याचे उघड झाले आहे. गावचे पोलीस पाटील विलास देविदास बनसोडे यांनी दिलेल्या माहितीनुसार चेतन इंगळे 25 फेब्रुवारीपासून बेपत्ता होता. संशय निर्माण झाल्यानंतर पोलिसांनी शोधमोहीम सुरू केली.

यावेळी आरोपी रोशन इंगळे याने थरकाप उडवणारी कबुली देत सांगितले की, त्याने आरोपी क्रमांक 2 च्या मदतीने स्वतःच्या भावाच्या डोक्यात रॉडने वार करून त्याचा खून केला. त्यानंतर पुरावे नष्ट करण्याच्या उद्देशाने मृतदेह जाळून त्याची राख नदीत फेकून दिली.

या निर्घृण हत्याकांडामुळे राहुड गावात भीतीचे वातावरण निर्माण झाले असून नात्यांमधील क्रौर्याचा भयावह चेहरा पुन्हा एकदा समोर आला आहे.

सद्यस्थितीत प्रकरणाचा तपास पोलीस उपनिरीक्षक मुळीक यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू असून वरिष्ठ अधिकारी घटनास्थळी दाखल झाले आहेत. या थरारक गुन्ह्यामागील नेमके कारण काय? याकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.

spot_img

Related Articles

लोकप्रिय

error: Content is protected !!