spot_img
spot_img

डोणगावमध्ये हायमास्ट दिवा कोसळला; मोठी दुर्घटना थोडक्यात टळली!

डोणगाव (हॅलो बुलडाणा/अनिल राठोड)
डोणगावातील ओलांडेश्वर मंदिराजवळील (आरेगाव रोड) हायमास्ट दिवा अचानक कोसळला. सुदैवाने हा खांब नाल्याच्या दिशेला पडल्याने मोठी जीवितहानी टळली आहे.
अवघ्या २ वर्षात पोल गंजला  दीड-दोन वर्षांपूर्वीच बसवलेला हा लोखंडी खांब गंजल्यामुळे कोसळल्याचा प्राथमिक अंदाज आहे. इतक्या कमी वेळात खांब गंजल्याने कामाच्या दर्जाबाबत संताप व्यक्त होत आहे.
भाविकांची वर्दळ असणाऱ्या ठिकाणी हा प्रकार घडल्याने ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण आहे.

गावातील इतर सर्व हायमास्ट खांबांची तात्काळ तपासणी करून धोकादायक खांब दुरुस्त करावेत, अन्यथा मोठ्या दुर्घटनेची जबाबदारी कोण घेणार? असा सवाल ग्रामस्थ विचारत आहेत.

spot_img

Related Articles

लोकप्रिय

error: Content is protected !!