spot_img
spot_img

बुलढाण्यात जयंतीचा बिगुल! पवन भालेरावांच्या खांद्यावर उत्सवाची धुरा;भव्य रॅलीचा रोडमॅप तयार! पवन भालेराव करणार यंदाची जयंती ‘ग्रँड’

बुलढाणा (हॅलो बुलडाणा) बुलढाणा शहरात दरवर्षी जल्लोषात साजरा होणाऱ्या विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सवाच्या तयारीला यंदा जोरदार सुरुवात झाली असून सार्वजनिक जयंती उत्सव समितीच्या अध्यक्षपदी पवन भालेराव यांची एकमताने निवड करण्यात आली आहे. त्यामुळे यंदाच्या जयंती सोहळ्याबाबत शहरात उत्साहाची लाट उसळली आहे.

राष्ट्रपिता महात्मा ज्योतिबा फुले जयंतीपासून सुरू होणारा हा उत्सव आंबेडकर जयंतीदिनी भव्य, ऐतिहासिक आणि लक्षवेधी रॅलीत रूपांतरित होतो. लाखोंच्या उपस्थितीत होणाऱ्या या सोहळ्याचे नियोजन सार्वजनिक जयंती उत्सव समितीकडून काटेकोरपणे केले जाते. सोमवार, दि. 23 फेब्रुवारी 2026 रोजी विश्राम भवन येथे आयोजित बैठकीत नवीन अध्यक्ष निवडीचा निर्णय घेण्यात आला. बैठकीच्या अध्यक्षस्थानी 2025 चे अध्यक्ष निलेश राऊत होते.

प्रास्ताविकातून आशिष बाबा खरात यांनी गेल्या वर्षभरात राबविण्यात आलेल्या सामाजिक, शैक्षणिक व सांस्कृतिक उपक्रमांचा सविस्तर लेखाजोखा मांडला. निलेश राऊत यांनी 2025 मधील विविध कार्यक्रमांचा आढावा घेत सर्व सहकाऱ्यांचे आभार मानले आणि यंदाच्या नियोजनाचा आराखडा मांडला.

नवनियुक्त अध्यक्ष पवन भालेराव यांनी स्पष्ट शब्दांत सांगितले की, यंदाची जयंती अधिक भव्य, नाविन्यपूर्ण आणि ऐतिहासिक करणार आहोत. समाजबांधवांनी मोठ्या संख्येने सहभागी होऊन सहकार्य करावे. त्यांच्या निवडीने तरुण वर्गात विशेष उत्साह दिसून आला.

या बैठकीस आशिष बाबा खरात, नगरसेवक प्रशांत जाधव, वैशालीताई ठाकरे, गणेश इंगळे, निलेश गायकवाड, कुणाल पैठणकर, अमोल खरे, अमोल वाठोरे, उमेश हेलोडे, सनी पैठणे, मंगेश इंगळे यांच्यासह शहरातील तरुण मोठ्या संख्येने उपस्थित होते.

spot_img

Related Articles

लोकप्रिय

error: Content is protected !!