बुलढाणा (हॅलो बुलढाणा) जिल्ह्यात दमदार पाऊस झाला. या पावसात एका नदीला पूर आल्याने एक चार चाकी वाहन वाहून नेले. सुदैवाने या वाहनात कुणी बसलेले नव्हते.
खामगाव तालुक्यातील खामगाव – नांदुरा रोडवरील सुटाळा गावातील गावातून जाणारी छोटी नदी खळखळायला लागली. दरम्यान या नदीने कडेला उभी असलेली एक चार चाकी कार अक्षरशः डोळ्यादेखत वाहून नेली. नशीबच म्हणावे लागेल की या वाहनात कोणी बसलेले नव्हते! नदीचा प्रवाह एवढा वाढला होता की, लगतच असलेले एक पानाचे दुकान देखील त्या चार चाकी वाहनाच्या बरोबरीनने वाहत गेले.
बुलढाणा चिखली, बुलढाणा, नांदुरा घाटाखालील गावांचा घाटावरील मुख्यालयाशी संपर्क तुटल्याचे चित्र आहे.