spot_img
spot_img

खेर्डा सर्कलमध्ये भाजपाचा जल्लोष; संजूभाऊंच्या ‘साउथ इंडियन लूक’ची चर्चा, ऋषिकेश देशमुखांसह शेकडो युवकांचा पक्षप्रवेश!

जळगाव जामोद (हॅलो बुलडाणा/प्रतिनिधी) खेर्डा जिल्हा परिषद सर्कलमध्ये भाजपाचा जबरदस्त शक्तिप्रदर्शन सोहळा पार पडला. तरुण तडफदार नेतृत्व ऋषिकेश अमोल देशमुख यांनी शेकडो युवकांसह भारतीय जनता पक्षात जाहीर प्रवेश करत राजकीय वातावरण तापवले. हा पक्षप्रवेश सोहळा जळगाव जामोदचे लोकप्रिय आमदार तथा माजी मंत्री डॉ.संजय कुटे उर्फ संजूभाऊ यांच्या दमदार उपस्थितीत झाला.

कार्यक्रमात संजूभाऊंची एंट्रीच चर्चेचा विषय ठरली. एकदिवसीय ट्रेडिशनल ‘साउथ इंडियन लूक’मध्ये त्यांनी कार्यकर्त्यांसमोर एन्ट्री मारताच “संजूभाऊ तो छा गये!” अशा घोषणा घुमल्या. पांढरा पारंपरिक पोशाख, आत्मविश्वासपूर्ण देहबोली आणि कार्यकर्त्यांशी थेट संवाद यामुळे वातावरण भारावून गेले. प्रथम कार्यकर्ता, नंतर नेता हे आपले तत्व असल्याचे त्यांनी पुन्हा अधोरेखित करत प्रत्येक युवकाला रोजगार देण्याचा निर्धार व्यक्त केला. पुढील चार वर्षांत जळगाव जामोद मतदारसंघ बारामतीप्रमाणे विकसित करणार, अशी ठाम ग्वाही त्यांनी दिली.

यावेळी नगराध्यक्ष गणेश दांडगे, उपाध्यक्ष कैलास पाटील यांच्यासह नगरसेवकांचा सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ज्येष्ठ भाजपा कार्यकर्ते रामेश्वर उगले होते. प्रमुख उपस्थितीत जिल्हाध्यक्ष सचिन देशमुख, विधानसभा प्रमुख गजानन सरोदे, तालुका अध्यक्ष संजय पांडव उपस्थित होते.

पक्षप्रवेश करणाऱ्यांमध्ये ऋषिकेश अमोल देशमुख, गजानन उगळकार, माजी सरपंच शिरीष वानखडे, उपसरपंच खेर्डा खुर्द, देवानंद वानखडे, अमित देशमुख, बाळू सोनेकर, सुजित देशमुख, गौरव वेलकर, स्वप्निल उमरकर, सुपा उमरकर, गोपाल राजाभाऊ देशमुख, शिवम नवघरे, देवा कुटे, अशोकराव देशमुख, रमेशराव देशमुख, मधुकरराव देशमुख, अभिजीत देशमुख, दिलीप देशमुख, विश्वंभर वेरुळकर, बाळु सोनवणे यांचा समावेश होता. सूत्रसंचालन प्रकाश वाघ यांनी तर प्रास्ताविक प्रविण भोपळे यांनी केले.

spot_img

Related Articles

लोकप्रिय

error: Content is protected !!