spot_img
spot_img

अहो आश्चर्यम! पेना एवढे फुलपाखरू पाहिले का?

बुलढाणा (हॅलो बुलढाणा) पाऊस पडला की, हिरवळीवर झेपावलेल्या किंवा बसलेल्या मनमोहक अशा फुलपाखरांकडे पाहून डोळे स्थिरावतात! परंतु बुलढाण्यात फारसे देखणे नसलेले एक मोठ्या आकाराचे फुलपाखरू कौतुकाचा विषय ठरत आहे.

बुलढाणा येथील खालीद बिन वलीद नगर येथे काल ७ जुलैच्या रात्री ११ वाजता एका जाळीवर हे मोठे फुलपाखरू दिसून आले. या फुलपाखराला पत्रकार कासिम शेख यांनी कॅमेऱ्याबद्ध केले आहे. खालीद बिन वलीद नगर हा भाग अजिंठा पर्वतरांगेच्या टोकावर वसलेला आहे. तसे तर जंगलव्याप ्त शहर असल्याने आणि ज्ञानगंगा अभयारण्यामुळे येथे विविध रंगाचे आणि विविध जातीचे सुंदर फुलपाखरू पाहायला मिळते. मात्र रात्री आढळून आलेल्या या मोठ्या फुलपाखराचा एका पेना एवढा आकार आहे. जर पंख उघडले तर या फुलपाखराचा आकार आणखी वाढू शकते. तज्ञांच्या म्हणण्यानुसार,सदर्न बर्डविंग किंवा कॉमन बर्डविंग नावाने ओळखले जाणारे फुलपाखरू हे भारतातील आकाराने सर्वात मोठे फुलपाखरू आहे. याचा आकार सुमारे १२०-१९० मि.मी. एवढा असतो, अशी तज्ञांची माहिती आहे. परंतु रात्री खालीद बिन वलीद नगर येथे आढळून आलेले फुलपाखरू चर्चेचा विषय ठरत आहे.

spot_img

Related Articles

लोकप्रिय

error: Content is protected !!