spot_img
spot_img

राष्ट्रपती द्रौपदी मुर्मु यांच्या दौऱ्यापूर्वी बुलढाण्यात हायअलर्ट; प्रशासन सज्ज!

बुलढाणा (हॅलो बुलडाणा) द्रौपदी मुर्मु यांच्या नियोजित दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर बुलढाणा जिल्ह्यात प्रशासनाने अक्षरशः हायअलर्ट जाहीर केला आहे. सुरक्षा व्यवस्थेचा कडक फास आवळत जिल्हा पोलीस आणि प्रशासन पूर्ण ताकदीने मैदानात उतरले आहेत. विशेष पोलीस महानिरीक्षक रामनाथ पोकळे यांनी स्वतः दौऱ्याशी संबंधित प्रत्येक ठिकाणाची पाहणी करत अधिकाऱ्यांना स्पष्ट शब्दांत सूचना दिल्या-कोणतीही ढिलाई चालणार नाही!

सभास्थळ, हेलिपॅड, विश्रांतीगृह आणि संपूर्ण मार्गावरील संवेदनशील ठिकाणांची बारकाईने तपासणी करण्यात आली. बॉम्ब शोधक पथक, श्वान पथक आणि दंगल नियंत्रण पथक तैनात करण्याचे आदेश देण्यात आले असून, बहुस्तरीय सुरक्षा कवच उभारले जात आहे. वाहतूक व्यवस्थापनापासून ते आपत्कालीन आराखड्यापर्यंत प्रत्येक बाबीचा आढावा घेण्यात आला.

पोलीस अधीक्षक सुधीर तांबे, अपर पोलीस अधीक्षक श्रेणीक लोढा आणि इतर विभागांचे वरिष्ठ अधिकारी यावेळी उपस्थित होते. वैद्यकीय सुविधा, स्वच्छता आणि प्रोटोकॉलचे काटेकोर पालन यावर विशेष भर देण्यात आला.

spot_img

Related Articles

लोकप्रिय

error: Content is protected !!