बुलढाणा (हॅलो बुलडाणा) हर्षवर्धन सपकाळ यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांची तुलना टिपू सुलतान यांच्याशी केल्याच्या कथित विधानामुळे बुलढाण्यात राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. या विधानाचा निषेध करत भारतीय जनता पक्षाच्या वतीने आज दि. १५ फेब्रुवारी २०२६ रोजी दुपारी ठीक १२ वाजता जयस्तंभ चौक येथे तीव्र आंदोलन छेडण्यात येणार असल्याची घोषणा जिल्हा जिल्हाध्यक्ष विजयराज शिंदे यांच्या आदेशानुसार शहराध्यक्ष मंदार बाहेकर यांनी केली आहे.
छत्रपती शिवाजी महाराज हे महाराष्ट्राच्या अस्मितेचे प्रतीक आहेत. त्यांची तुलना जबरदस्तीच्या आणि धर्मांध राजवटीचे प्रतिनिधित्व करणाऱ्या टिपू सुलतानशी करणे म्हणजे इतिहासाचा आणि महाराष्ट्राच्या स्वाभिमानाचा अपमान आहे, असा आरोप भाजपकडून करण्यात आला आहे.
भाजप पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून या आंदोलनाला यशस्वी करावे, असे आवाहन करण्यात आले आहे. भाजप या पार्श्वभूमीवर बुलढाण्यातील राजकीय वातावरण आणखी ढवळून निघण्याची चिन्हे असून, उद्याच्या आंदोलनाकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.










