लोणार (हॅलो बुलडाणा /यासीन शेख) लोणार शहरातील शिवाजी नगर पासून बस स्टँण्ड कड़े जाणाऱ्या एकमेव मुख्य मार्गावर गेल्या वर्ष भरापासुन मंजूर झालेले रस्त्याचे आणि नालीचे बांधकाम सुरु न झाल्याने पावसाळ्यात या रस्त्यावर २-३ फूटा पर्यंत पाणी साचुन रस्त्याला गटारीचे स्वरूप प्राप्त होत आहे.८ दिवसात मंजूर कामास सुरवात न झाल्यास प्रशासनाच्या विरोधात नागरिकांसह रस्त्यावर ठिय्या आंदोलनास बसणार असल्याचा इशारा युवक कॉंग्रेस चे जिल्हाध्यक्ष अनिकेत भैय्या मापारी यांनी विभागीय आयुक्त अमरावती यांना निवेदनातून दिला आहे.
अ वर्ग दर्जा प्राप्त पर्यटन स्थळ असलेल्या लोणार शहरात गेल्या सहा महिन्या पासून भूमिगत गटार योजनेचे काम सुरु आहे यामुळे संबंधित कंट्राटदराने शहरातील सर्व रस्ते फोडून ठेवले आहे.परिणामी पावसाळ्यात या रस्त्यावरुन चालने ही नागरिकांना कठिन होऊन बसले आहे.
शिवाजी नगर ते बस स्टँण्ड कड़े जान्यासाठी असलेल्या एकमेव रस्त्याची दुरावस्था झाली आहे. या रस्त्याच्या आणि नालीच्या बांधकामाचे टेंडर १ वर्षा पूर्वी होऊन देखील अद्याप पर्यंत या कामास सुरवात झालेली नाही त्यात भुयारी गटार योजनेमुळे रस्त्याची चाळणी झाली आहे या मार्गावरुन नियमित शहर वासियांचा राबता सुरु असतो अशात मोठा पाऊस पडल्यास या रस्त्यावर २-३ फूटा पर्यंत पावसाचे पानी साचुन रस्त्याला डबकयाचे स्वरूप प्राप्त होते. याबाबत नगर पालिकेच्या मुख्याधिकारी यांच्या कड़े वारंवार विनंती करून देखील परिस्थिति मध्ये सुधार झाल्याचे दिसून येत नाही त्यामुळे येत्या आठ दिवसात रस्त्याचा प्रश्न मार्गी न लावल्यास नागरिकांना सोबत घेऊन चिखलात प्रशासना विरुद्ध ठीय्या आंदोलन करणार असल्याचा इशारा युवक कॉंग्रेस चे जिल्हाध्यक्ष अनिकेत मापारी यांनी विभागीय आयुक्त यांना निवेदनातून दिला आहे.