spot_img
spot_img

ताठे सरकार (पाटील) इज बॅक! लोकसभा रणांगणाची तयारी सुरू; जिल्ह्याच्या राजकारणात नवा ‘धमाका’ची चर्चा

बुलढाणा (हॅलो बुलढाणा) जिल्ह्यातील राजकीय व सामाजिक क्षेत्रात कायम चर्चेत राहिलेले नाव म्हणजे राजेश ताठे उर्फ “ताठे सरकार”. शासकीय नोकरीला रामराम ठोकून समाजसेवेच्या वाटेवर उतरलेल्या ताठे सरकारांनी आता पुन्हा एकदा जोरदार एंट्री केल्याची चर्चा रंगली आहे. लोकांशी थेट संपर्क, आक्रमक भूमिका आणि वेगळ्या शैलीमुळे त्यांनी स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली असून “सरकार” ही पदवी देखील त्यांना जनतेनेच दिली आहे.

मागील काही दिवसांपासून सोशल मीडियावर त्यांचा एक व्हिडिओ प्रचंड व्हायरल होत आहे. प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा देतानाच त्यांनी जिल्ह्यातील प्रश्नांवर भाष्य केले आणि आगामी राजकीय वाटचालीचे संकेत दिले. यानंतर राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले असून ताठे सरकार बुलढाणा लोकसभा मतदारसंघातून मोठी राजकीय खेळी करण्याच्या तयारीत असल्याची जोरदार चर्चा सुरू आहे.

विश्वासू कार्यकर्त्यांमार्फत जिल्ह्यात मोर्चेबांधणी सुरू झाल्याचे बोलले जात असून विविध भागांत संपर्क वाढविण्यावर भर दिला जात आहे. मराठा (पाटील) समाजासह सर्वसामान्यांशी असलेले घट्ट संबंध आणि आक्रमक शैलीमुळे येणाऱ्या 2029 च्या लोकसभा निवडणुकीत ते थेट रिंगणात उतरणार असल्याचे स्पष्ट संकेत मिळत आहेत.

दरम्यान, ताठे सरकारांच्या या हालचालींमुळे बुलढाणा जिल्ह्याच्या राजकारणात नवे समीकरण तयार होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. आगामी काळात ते नेमकी कोणती भूमिका घेतात, कोणत्या पक्षासोबत जातात किंवा स्वतंत्र लढत देतात याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.

spot_img

Related Articles

लोकप्रिय

error: Content is protected !!