spot_img
spot_img

जुनी इलेक्ट्रॉनिक वस्तू फेकण्यापूर्वी थांबा… बुलढाण्यात सुरू आहे ‘भाईजींचा’ खास उपक्रम!

बुलढाणा (हॅलो बुलडाणा) वाढत्या प्रदूषणाच्या पार्श्वभूमीवर शहर ई-कचऱ्याच्या गंभीर समस्येला सामोरे जात असताना बुलढाणा अर्बनच्या वतीने ठोस पाऊल उचलण्यात आले आहे. पूर्णम इकोविजन, पर्यावरण संरक्षण गतिविधी आणि परसिस्टंट फाऊंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने राबविण्यात येणारी ‘पेहल २०२६’ ई-कचरा संकलन मोहीम सध्या चर्चेचा विषय ठरत आहे. बुलढाणा अर्बनचे सर्वेसर्वा राधेश्याम चांडक यांनी नागरिकांना थेट आवाहन करत, “सहकारातून समृद्धी” या तत्त्वासोबत आता “सहकारातून स्वच्छता” साकारण्याची वेळ आल्याचे ठणकावले आहे.

घराघरात पडून असलेले जुने मोबाईल, लॅपटॉप, कॉम्प्युटर, चार्जर केबलसह विविध इलेक्ट्रॉनिक वस्तू थेट कचर्‍यात टाकल्यास पर्यावरणावर गंभीर परिणाम होऊ शकतो. त्यामुळे नागरिकांनी जबाबदारी स्वीकारत २०, २१ आणि २२ फेब्रुवारी रोजी सकाळी ९ ते दुपारी ५ या वेळेत बुलढाणा अर्बन मुख्य कार्यालयात ई-कचरा जमा करावा,असे आवाहन करण्यात आले आहे.

या मोहिमेसाठी श्री. प्रसाद ढवळे, श्री. अभिजित दोडके आणि श्री. विशाल ढवळे मो.9623217674,7720054179,9960884565 यांच्याशी संपर्क साधण्याचेही आवाहन करण्यात आले आहे.

spot_img

Related Articles

लोकप्रिय

error: Content is protected !!