spot_img
spot_img

गौरवाची बातमी! शारदा ज्ञानपीठच्या विद्यार्थ्यांनी वृद्धांसाठी उभारली लाखोंची मदत

बुलढाणा (हॅलो बुलढाणा) सामाजिक जाणीव आणि संवेदनशीलतेचा उत्कृष्ट नमुना दाखवत बुलढाणा येथील शारदा ज्ञानपीठ विद्यालयातील इयत्ता तिसरी ते सहावीच्या विद्यार्थ्यांनी HelpAge India या संस्थेसाठी तब्बल 1 लाख 6 हजार 638 रुपयांची मदत जमा करून आदर्श निर्माण केला आहे. लहान वयातच समाजाप्रती असलेली जबाबदारी ओळखत विद्यार्थ्यांनी उत्साहाने या उपक्रमात सहभाग नोंदवला.

या उपक्रमात नवमी माळी हिने 1300 रुपये, पार्थ बाबूर याने 1161 रुपये, तर गौरी मयुरे हिने 1111 रुपयांचे विशेष योगदान देत सर्वांचे लक्ष वेधले. विद्यार्थ्यांच्या या कार्याचे शाळेच्या प्रशासकीय जगताप मॅडम, मुख्याध्यापिका अंतरकर मॅडम, उपमुख्याध्यापक दीपक देशपांडे सर तसेच बासिद सर व गिरीष चौधरी सर यांनी मनापासून कौतुक केले. भविष्यातही अशा सामाजिक उपक्रमांमध्ये सक्रिय राहण्याचे मार्गदर्शन त्यांनी विद्यार्थ्यांना दिले.

विद्यार्थ्यांच्या या एकत्रित प्रयत्नातून गरजू वृद्धांना मदत होणार असून समाजात सकारात्मक संदेश पोहोचणार आहे. शिक्षक व पालकांनीही या उपक्रमाचे स्वागत केले असून शारदा ज्ञानपीठच्या विद्यार्थ्यांचा हा आदर्श इतरांसाठी प्रेरणादायी ठरत आहे.

spot_img

Related Articles

लोकप्रिय

error: Content is protected !!