spot_img
spot_img

घरफोडी करणारा ‘मेमरी’ पोलिसांच्या जाळ्यात; १.०९ लाखांचा मुद्देमाल जप्त!

बुलढाणा (हॅलो बुलडाणा) शहरात घरफोडी करून नागरिकांची झोप उडवणाऱ्या सराईत चोराला अखेर बुलढाणा शहर पोलिसांनी शिताफीने अटक केली आहे. शेख अरबाज ऊर्फ ‘मेमरी’ शेख मेहमुद (वय २५) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव असून त्याच्याकडून तब्बल १ लाख ९ हजार १३० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

मलकापूर रोड परिसरातील सचिन खिल्लारकर यांच्या बंद घरात ३ फेब्रुवारी रोजी अवघ्या अर्ध्या तासात घरफोडी करून सोन्या-चांदीचे दागिने व रोकड लंपास करण्यात आली होती. या घटनेनंतर पोलिसांनी गुप्त बातमीदारांच्या मदतीने तपासाची चक्रे वेगाने फिरवत आरोपीवर पाळत ठेवली. खामगाव रोड परिसरात सापळा रचत पोलिसांनी आरोपीला अटक केली असता त्याने गुन्ह्याची कबुली दिली.

तपासात आरोपीकडून ३१,५०० रुपये रोख, ३२,६३० रुपयांच्या चांदीच्या वस्तू, मोबाईल आणि गुन्ह्यात वापरलेली मोटारसायकल असा मोठा मुद्देमाल जप्त करण्यात आला. एवढेच नव्हे तर आरोपीने केलेल्या आणखी दोन घरफोडी व एक दुचाकी चोरीचा गुन्हाही उघडकीस आला आहे. पोलीस निरीक्षक रवि राठोड यांच्या मार्गदर्शनाखाली ही धडाकेबाज कारवाई करण्यात आली असून पुढील तपास सुरू आहे.

spot_img

Related Articles

लोकप्रिय

error: Content is protected !!