spot_img
spot_img

आ.शिंगणे साहेब इकडे लक्ष द्या हो! – नीलगायीचा कोवळ्या पिकांवर ताव! – त्रस्त शेतकरी काय म्हणतात ते वाचाच!

साखरखेर्डा (हॅलो बुलढाणा/दर्शन गवई) अंकुरलेल्या शेतातील कोवळ्या पिकात नील गायीनी हैदोस घातला असून या शेतकऱ्यांच्या ज्वलंत समस्येकडे आमदार डॉ. राजेंद्र शिंगणे यांनी लक्ष द्यावे, अशी मागणी शेतकरी करीत आहेत.

सिंदखेडराजा तालुक्यात सोयाबीन हे महत्त्वाचे पिक असून जवळजवळ १०० टक्के पेरण्या पूर्ण झाल्यात. शेत हिरवेगार झाले. कोवळ्या सोयाबीन पिकावर निलगाय ( रोही ) मनसोक्त ताव मारत आहेत. तेवढ्यावरच ते थांबत नाही तर कळप शेतातून धावत असल्याने संपूर्ण शेती तुडविल्या जाते.एका एका कळपात ७५ ते ८० रोही असतात. शेतकरी हाकलायला जातो तर शेतकऱ्यांच्या अंगावर चाल करतात. सोनोशी,दुसरबीड , मलकापूर पांग्रा,शेंदुर्जन , साखरखेर्डा भागात एफ क्लासचे ४ हजारांपेक्षा जास्त क्षेत्रफळ आहे. या जंगलात हे प्राणी राहात नाहीत.आता संपूर्ण क्षेत्रच त्यांनी व्यापून टाकले आहे. एका एका गाव क्षेत्रात दोन दोन कळप दिसत आहेत. रस्त्यावर धावताना रोहिने अनेक अपघात घडविले. याची दखल आमदार डॉ.राजेंद्र शिंगणे यांनी घेऊन विधानसभेत लक्षवेधी सूचना मांडावी आणि रोही या प्राण्याचा कायम बंदोबस्त करावा,अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.

शेतकरी काय म्हणतात?

▪️सिंदखेडराजा तालुक्यात निलगायीची संख्या प्रचंड वाढली असून या जंगली प्राण्याने उभ्या पिकात धुडगूस घातला आहे. आमदार संदीप शिरसागर यांनी जसा रानडुकरांचा बंदोबस्त शासनाकडून केला.तसाच बंदोबस्त आपल्या भागातील आमदारांनी विधानसभेत लक्षवेधी सूचना मांडून करावा.
– बाबुराव मोरे
माजी समाजकल्याण सभापती
जिल्हा परिषद बुलढाणा

▪️या भागात रोही,माकड आणि रानडुक्कर या प्राण्यांची संख्या वाढली आहे.हे प्राणी माणसावर चाल करतात . याची दखल घेऊन शासनाने या प्राण्यांचा बंदोबस्त करावा.
-सुधा देशमुख ( क्रीडा मार्गदर्शक)
ऊस उत्पादक शेतकरी
सवडद

▪️शेतकरी शेतात एकटा असेल तर रोही त्या शेतकऱ्यांवर हल्ला करतात.शेती कशी करावी हा प्रश्न उपस्थित होत आहे.मागिल वर्षी सुनील तिडके यांच्यामागे रोही लागला होता. त्यांनी आरडाओरड केल्याने परिसरात कुत्रे धावत रोही यांच्यावर धावल्याने तिडके यांचे प्राण वाचले.
– दिगंबर खरात
शेतकरी, साखरखेर्डा

spot_img

Related Articles

लोकप्रिय

error: Content is protected !!