spot_img
spot_img

देऊळगाव साकर्शात राजकीय ‘सरप्राईज’! मेहकरचे आमदार खरात-माजी आमदार रायमुलकर एकत्र? चर्चांना उधाण

मेहकर (हॅलो बुलडाणा) राजकीय मतभेद बाजूला ठेवून सामाजिक आणि धार्मिक कार्यक्रमांमध्ये एकत्र येण्याचे चित्र मेहकर तालुक्यातील देऊळगाव साकर्शा येथे पाहायला मिळाले. संत नारायणपुरी महाराज यांच्या पुण्यतिथीनिमित्त आयोजित कार्यक्रमात मेहकरचे विद्यमान आमदार सिद्धार्थ खरात आणि माजी आमदार डॉ. संजय रायमुलकर एकाच कार्यक्रमात दिसल्याने राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे.

कार्यक्रमादरम्यान महाप्रसादाचे वाटप करण्यात आले असून आमदार खरात यांनी स्वतः पुढाकार घेत उपस्थितांना प्रसाद दिला. यावेळी माजी आमदार रायमुलकर यांनाही महाप्रसाद देण्यात आल्याने उपस्थितांमध्ये विविध प्रतिक्रिया उमटल्या. राजकीय स्पर्धा असली तरी धार्मिक परंपरा आणि सामाजिक एकात्मता यांना प्राधान्य दिले गेले पाहिजे, असा संदेश या प्रसंगातून समोर आल्याची चर्चा स्थानिक पातळीवर सुरू आहे.

संत नारायणपुरी महाराजांच्या पुण्यतिथीनिमित्त गावात धार्मिक वातावरण निर्माण झाले होते. मोठ्या संख्येने भाविकांनी कार्यक्रमाला उपस्थिती लावली. राजकीय नेते एकत्र आल्याने कार्यकर्त्यांमध्येही उत्सुकता दिसून आली. या घटनेमुळे भविष्यातील राजकीय समीकरणांबाबत तर्कवितर्कांना सुरुवात झाली असली, तरी आयोजकांनी हा कार्यक्रम पूर्णपणे धार्मिक स्वरूपाचा असल्याचे स्पष्ट केले.

spot_img

Related Articles

लोकप्रिय

error: Content is protected !!