बुलढाणा (हॅलो बुलढाणा) पुढील काही दिवस पावसाचा जोर वाढेल, असा इशारा हवामानशास्त्र विभागाने दिल्याने बुलढाणा जिल्ह्यात रात्रीपासून मुसळधार पाऊस कोसळतोय! त्यामुळे जिल्हा जलमय झाल्याचे सुखद चित्र आहे.
हवामानशास्त्र विभागाने राज्यातील काही ठिकाणी यलो, तर काही ठिकाणी ऑरेंज अलर्ट जारी केलाय.10 जुलैपर्यंत बऱ्याच भागात पावसाची शक्यता आहे. बुलढाणा जिल्ह्यातील अनेक भागांमध्ये रिमझिम पाऊस कोसळतोय तर कुठे मुसळधार पाऊस बरसत आहे. ही पावसाची संततधार शेतकऱ्यांसह नागरिकांना अनुभवायला मिळतेय.या पावसामुळे वातावरणात गारवा निर्माण झालाय. उद्या, 10 जुलैला सुद्धा पावसाचा अंदाज देण्यात आला असून हा पाऊस शेतीपिकांसाठी संजीवनी ठरणार आहे.