spot_img
spot_img

सुलतानपूरच्या सुपुत्राचा महाराष्ट्रात डंका! अमित गोविंद मंत्री यांना ‘महाराष्ट्र बिझनेस आयकॉन अवॉर्ड’

सुलतानपूर (हॅलो बुलडाणा/मोईन खान)
ग्रामीण मातीतील जिद्द, मेहनत आणि स्वप्नांची आग असली की महाराष्ट्रही दखल घेतो, हे पुन्हा एकदा सिद्ध झाले आहे. लोणार तालुक्यातील सुलतानपूर गावचा सुपुत्र, हायविनो फार्मास्युटिकल्स प्रा. लि.चे व्यवस्थापकीय संचालक अमित गोविंद मंत्री यांनी उद्योगविश्वात जबरदस्त मुसंडी मारत ‘महाराष्ट्र बिझनेस आयकॉन अवॉर्ड २०२५’ पटकावला आहे. त्यामुळे सुलतानपूरसह संपूर्ण लोणार तालुक्याच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला गेला आहे.

नाशिक येथील सोमा वाईन व्हिलेज येथे ३ फेब्रुवारी २०२६ रोजी दिमाखात पार पडलेल्या या सोहळ्यात मराठी चित्रपटसृष्टीतील नामवंत अभिनेत्री वर्षा उसगांवकर, सोनाली कुलकर्णी आणि प्रार्थना बेहेरे यांची उपस्थिती होती. ‘शुअर मी ग्रुप’चे संस्थापक सुधीर पाठाडे यांच्या हस्ते हा बहुमान प्रदान करण्यात आला.

शून्यातून सुरुवात करत औषधनिर्माण क्षेत्रात विश्वासार्ह ब्रँड उभारणाऱ्या अमित मंत्री यांनी गुणवत्ता, सुरक्षितता आणि परवडणारी औषधे हे सूत्र जपले. आधुनिक तंत्रज्ञान, नवकल्पना आणि प्रामाणिकपणाच्या जोरावर त्यांनी उद्योगात आपला ठसा उमटवला. या यशामुळे त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

spot_img

Related Articles

लोकप्रिय

error: Content is protected !!