spot_img
spot_img

घरकुलचे हफ्ते थकले; संतप्त लाभार्थ्यांचा प्रशासनाला थेट अल्टिमेटम!

बुलढाणा (हॅलो बुलडाणा/सलमान अत्तार) गेल्या चार महिन्यांपासून घरकुल योजनेचे हफ्ते थकित असल्याने बुलढाणा तालुक्यातील लाभार्थ्यांचा संताप उफाळून आला आहे. याच पार्श्वभूमीवर दिनांक 03 फेब्रुवारी 2026 रोजी दुपारी 2 वाजता जिल्हा परिषद बुलढाणा येथे प्रकल्प अधिकारी यांची भेट घेऊन लाभार्थ्यांनी थेट जाब विचारला. हफ्ते का मिळत नाहीत, याबाबत चर्चा झाली असून अधिकाऱ्यांनी येत्या 10 दिवसांत सर्व पात्र लाभार्थ्यांच्या खात्यात अनुदान जमा होईल, असे आश्वासन दिले.

मात्र, ठोस कारवाई न झाल्यास पंचायत समिती बुलढाणा येथे उपोषणाचा इशारा लाभार्थ्यांनी दिला आहे. आता आणखी विलंब सहन केला जाणार नाही, असा स्पष्ट इशारा देत लाभार्थ्यांनी प्रशासनावर दबाव वाढवला आहे. अधिकाऱ्यांनीही परिस्थिती गांभीर्याने घेत लवकरच प्रक्रिया सुरू करण्याचे सांगितले.

या वेळी चांडोळ येथील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. ग्रामपंचायत सदस्य राजू धनावत यांच्या मार्गदर्शनाखाली निवेदन देण्यात आले. विशाल देव्हाणे, शेख नजीर, शेख हक्कानी, शिवाजी जंजाळ, विशाल महेर, अशोक कांबळे, दीपक चांदवडे, समीर खान आदींची उपस्थिती होती.

spot_img

Related Articles

लोकप्रिय

error: Content is protected !!