बुलढाणा (हॅलो बुलढाणा) अलीकडे वाहने रस्त्यावर सुसाट धावू लागली आहेत. वाहतूक शाखा केवळ बघ्याची भूमिका वठवीत आहे. या दुर्लक्षामुळे आज एका बळीराजाला बोलेरो वाहनाने धडक देऊन गंभीर केले होते. उपचार दरम्यान त्यांचा मृत्यू झाला आहे.
बुलडाणा तालुक्यातील हतेडी बु. येथील शेतकरी गजानन दिगंबर जाधव वय 45 वर्ष हे 5 जुलै रोजी सकाळी आपल्या शेतात गेले होते. त्यांनी शेतातील गोठ्याची साफसफाई केली. जनावरांना चारापाणी करून घराकडे परत येत असतांना गावाजवळ सकाळी 7:30 वाजेच्या सुमारास बुलडाण्याहून धाडच्या दिशेने भरधाव वेगात जाणाऱ्या बोलेरो पिकअप वाहनाने त्यांना मागून जोरदार धडक दिली. यात ते गंभीर जखमी झाले होते. त्यांना बुलडाणा व नंतर छत्रपती संभाजीनगर येथील एका खाजगी रुग्णालयात नेण्यात आले. परंतु डोक्याला गंभीर मार लागल्याने उपचार अशक्य असल्याने त्यांना परत बुलडाणा येथील एका रुग्णालयात दाखल करण्यात आले. उपचार सुरू असताना आज रविवारी सकाळी त्यांचा मृत्यू झाला आहे. याप्रकरणी पिकअप वाहन मालक सय्यद अलीम सय्यद हबीब वय 22 वर्ष रा.वरुड ता.जि. बुलढाणा याच्या विरुद्ध बुलडाणा ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.