spot_img
spot_img

‘महाराष्ट्राचा बुलंद आवाज’ शांत झाला; सुंदरखेड येथे श्रद्धांजली कार्यक्रम

बुलढाणा (हॅलो बुलडाणा) महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री व अर्थमंत्री स्वर्गीय अजितदादा पवार यांच्या अकाली निधनाने राज्यभरात शोककळा पसरली असून, या पार्श्वभूमीवर बुलढाणा येथे सदाबहार सामाजिक संघटनेतर्फे भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. सुंदरखेड माऊली पार्क येथे आयोजित कार्यक्रमात संघटनेच्या सदस्यांनी एकत्र येत अजितदादांच्या कार्याला उजाळा दिला.

खंबीर नेतृत्व, स्पष्ट वक्तृत्व आणि विकासाभिमुख निर्णयांसाठी ओळखले जाणारे अजितदादा पवार यांच्या जाण्याने महाराष्ट्र पोरका झाल्याची भावना यावेळी व्यक्त करण्यात आली. सदाबहार सामाजिक संघटना ही वयोवृद्ध व निवृत्त सरकारी कर्मचाऱ्यांची संघटना असून, विविध सामाजिक उपक्रमांत ती अग्रभागी आहे. अजितदादांच्या निधनाने संघटनेत दुःखाचे वातावरण निर्माण झाले होते.

यावेळी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष नारायण रिंढे (निवृत्त नायब तहसीलदार) यांनी अजितदादांचा जीवनपट मांडत त्यांच्या राजकीय व सामाजिक कार्याचा आढावा घेतला. तसेच सुनील पिंपळगाव (निवृत्त न्यायालय कर्मचारी) यांनीही आपले विचार व्यक्त केले. उपस्थित सर्व सदस्यांनी आदरांजली अर्पण करून स्वर्गीय अजितदादा पवार यांना श्रद्धांजली वाहिली

spot_img

Related Articles

लोकप्रिय

error: Content is protected !!