चिखली (हॅलो बुलढाणा) पोलीस हप्ते वसुलीत दंग असल्याची चर्चा सुरू आहे.येथील चोऱ्यांचे प्रमाण दिवसागणिक वाढतच आहे. चोरट्यांनी मोटार रिवाइंडिंगचे दुकान देखील सोडले नाही.. तर ते फोडले.. एकूण 69, 000 रुपयांचा मुद्देमाल लंपास करण्यात आल्याची घटना बेराळा फाटा येथे घडली.अज्ञात आरोपीविरुद्ध अप क्र 511/2024 कलम 305(a),334(1) BNS
गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलीस सूत्रानुसार, फिर्यादी रामेश्वर मच्छिंद्र आसोलकर रा. भालगाव यांनी तक्रार दिली की, माझ्या मोटार रिवायडींग च्या दुकानातून 7.5 हॉर्स पॉवर सबमर्सिबल मोटर पंप एक किंमत अंदाजे 10000 रुपये,
5 हॉर्स पावर ओपन वेल मोटार पंप 12 नग किंमत अंदाजे 48000 रू,
3 हॉर्स पावर ओपन वेल मोटर पंप तीन किंमत अंदाजे 9000 रू,
मोना ब्लॉक भंगार चार किलो तांब्याचे वायर किंमत अंदाजे 2000 रू असा एकूण 69,000 रू माल कोणीतरी अज्ञात चोरट्याने चोरून नेला आहे. या तक्रारीवरून गुन्हा दाखल झाला आहे.