बुलढाणा (हॅलो बुलढाणा) महाराष्ट्र राज्याचे दिवंगत उपमुख्यमंत्री, लोकनेते स्व.अजितदादा पवार यांच्या आकस्मिक निधनाने संपूर्ण महाराष्ट्र शोकसागरात बुडाला आहे. या दुःखद घटनेच्या पार्श्वभूमीवर बुलढाणा शहरवासियांतर्फे स्व. अजितदादा पवार यांना सर्वपक्षीय व सर्वधर्मीय श्रद्धांजली अर्पित करण्यासाठी भव्य शोकसभेचे आयोजन करण्यात आले आहे.
ही शोकसभा उद्या शुक्रवार, दिनांक ३० जानेवारी २०२६ रोजी सायंकाळी ठीक ४.३० वाजता गांधी भवन प्रांगण, बुलढाणा येथे आयोजित करण्यात आली आहे. या शोकसभेसाठी बुलढाणा शहरातील सर्वपक्षीय नेते व कार्यकर्ते, सर्वधर्मीय नागरिक, व्यापारी-व्यावसायिक, उद्योजक, शासकीय व निमशासकीय अधिकारी-कर्मचारी, विविध संस्थांचे पदाधिकारी, डॉक्टर्स, पत्रकार, वकील तसेच समस्त माता-भगिनी व नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन करण्यात आले आहे.










