spot_img
spot_img

रातोरात बीअरबार रिकामा! देऊळगाव राजा येथे अज्ञात चोरट्यांचा मोठा डल्ला

देऊळगाव राजा (हॅलो बुलडाणा) शहरातील जाफराबाद रोडवरील “प्रतीक” नामक बीअरबार फोडून अज्ञात चोरट्यांनी तब्बल २ लाख २९ हजार रुपयांहून अधिक किमतीचा मुद्देमाल चोरून नेल्याची खळबळजनक घटना समोर आली आहे. या धाडसी चोरीमुळे देऊळगाव राजा शहरातील कायदा-सुव्यवस्थेवर गंभीर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे.

या प्रकरणी जनार्धन बाबुराव शिवरकर (वय ४०, व्यवसाय बीअरबार मालक, रा. शिंगणे गनर, ता. देऊळगाव राजा) यांनी देऊळगाव राजा पोलीस ठाण्यात तोंडी रिपोर्ट दाखल केला आहे. २४ जानेवारी रोजी रात्री ९.३० वाजता बीअरबार बंद करून घरी गेले असता, दुसऱ्या दिवशी सकाळी ९.३० वाजता मॅनेजर समाधान बोबडे बार उघडण्यासाठी गेले असता शटरचे कुलूप कापलेले आढळले.

बारमध्ये प्रवेश केल्यानंतर संपूर्ण सामान अस्ताव्यस्त, काऊंटरचे ड्रॉवर उघडे, रोख रक्कम गायब आणि गोडाऊनचा कोंडा तुटलेला असल्याचे स्पष्ट झाले. तपासणीत २०६,७५४ रुपयांची विदेशी दारू,३,००० रुपयांचा DVR, तसेच २०,००० रुपयांचे ६ CCTV कॅमेरे फोडून नुकसानबकेल्याचे निष्पन्न झाले. एकूण नुकसान २,२९,७५४ रुपये असल्याचा प्राथमिक अंदाज आहे.

घटनेची माहिती मिळताच दारूबंदी विभागाचे अधिकारी घटनास्थळी दाखल झाले असून पंचनामा करण्यात आला आहे. मात्र, CCTVच फोडून चोरटे पसार झाल्याने तपासाला मोठे आव्हान निर्माण झाले आहे.

spot_img

Related Articles

लोकप्रिय

error: Content is protected !!