रायपूर (हॅलो बुलडाणा/ सचिन जयस्वाल) स्व. मंजुळाई कोरडे पाटील ग्रामीण विकास बहुउद्देशीय संस्था संचलित श्री शिवाजी विद्यालय रायपूर येथे 26 जानेवारी रोजी प्रजासत्ताक दिन मोठ्या उत्साहात व देशभक्तीच्या वातावरणात साजरा करण्यात आला. संस्थेचे सचिव श्री एकनाथरावजी कोरडे यांच्या हस्ते ध्वजारोहण पार पडले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थेच्या अध्यक्षा सौ. मीनाताई कोरडे पाटील उपस्थित होत्या.
विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या ओजस्वी भाषणांनी, देशभक्तीपर गीतांनी उपस्थितांमध्ये राष्ट्रप्रेमाची ज्वाला पेटवली. संगीत कवायत व लेझिम पथकाच्या शिस्तबद्ध आणि जोशपूर्ण सादरीकरणाने कार्यक्रमाला विशेष रंगत आणली.
कार्यक्रमास श्री रामराव सिरसाठ, सूर्याजी सिरसाठ, रमेश सिरसाठ तसेच संस्थेचे उपाध्यक्ष शुभम एकनाथरावजी कोरडे यांची प्रमुख उपस्थिती लाभली. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी शाळेचे मुख्याध्यापक, शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांनी केलेले परिश्रम कौतुकास्पद ठरले.










