खामगाव (हॅलो बुलढाणा) विद्या मंदिरात शिक्षिकेवर अत्याचार होत असल्याच्या घटना समोर येत आहेत.असाच प्रकार खामगाव शहरातील एका शाळेत घडला. शाळेच्या अध्यक्षांनी शाळेतील शिक्षिकेसोबत अश्लील कृत्य करून तिचा विनयभंग केल्याची घटना 2023 ते 2024 च्या दरम्यान घडल्याचे तक्रारीत म्हटले आहे. गोपाल बाबुलाल अग्रवाल असे आरोपीचे नाव आहे.
सविस्तर वृत्त असे की पीडित महिला शिक्षिका म्हणून काम करत होती. कोरोना असल्यामुळे शाळा बंद होती. तेव्हा ऑनलाईन पद्धतीने क्लास घेऊन शिकवण्यात येत होते. 2021 पासून शाळा नियमित सुरू झाली. दरम्यान शाळेत नवीन ऍडमिशन करण्याकरता शिक्षकांना अध्यक्ष गोपाल बाबूलाल अग्रवाल यांनी सूचना केल्या त्यानुसार पीडित शिक्षिकेने वीस विद्यार्थी पेक्षा जास्त विद्यार्थ्यांची ऍडमिशन केली त्यामुळे अध्यक्ष यांनी शिक्षकेला केबिनमध्ये बोलून अभिनंदन केले पीडित महिलेला अश्लील हावभाव करून जवळीक साधन्याचा प्रयत्न केला सदर घटनेकडे महिलेने मुलाच्या भविष्यासाठी दुर्लक्ष केले मात्र अध्यक्ष गोपाल बाबूलाल अग्रवाल याचा प्रताप काही थांबला नाही. जानेवारी 2024 मध्ये अग्रवाल यांनी पीडित महिलेला परत अश्लील कृत्य करून विनयभंग केला.त्रासाला कंटाळून नोकरी सोडण्याचा राजीनामा पीडित महिलेने दिला. मात्र त्यावेळी अध्यक्षांनी राजीनामा स्वीकारला नाही. सततच्या त्रासाला कंटाळून महिलेने खामगाव शहर पोलीस स्टेशनला शाळेचे अध्यक्ष गोपाल बाबूलाल अग्रवाल यांच्या विरोधात तक्रार दिली. तक्रारीवरून खामगाव पोलीसानी कलम 354 A 509,506 नुसार गुन्हा दाखल केला आहे.
क्रमशः