spot_img
spot_img

‘लेखी आश्वासन हवेत विरले’ – सुलतानपुरात ग्रामपंचायतीसमोर आमरण उपोषण

सुलतानपूर (हॅलो बुलडाणा/मोईन खान)
निवेदने दिली, विनंत्या केल्या, पण प्रशासनाने फक्त खोटी आश्वासने दिली.अशा संतप्त शब्दांत प्रशासनाचा निषेध करत सुलतानपूर येथील शेख अफसर शेख मन्सूर यांनी सोमवार, २५ जानेवारीपासून ग्रामपंचायत कार्यालयासमोर आमरण उपोषण सुरू केले आहे. वर्षानुवर्षे प्रलंबित असलेल्या हक्काच्या रस्त्यासाठी अखेर संघर्षाचा मार्ग स्वीकारावा लागल्याने गावात तीव्र असंतोष पसरला आहे.

सुलतानपूर येथील गट नं. १५२/२ व १५२/४ मधील वॉर्ड नं. १ मधील रस्ता शेख अफसर यांच्या घरापासून मारोती मंदिरापर्यंत अतिक्रमणामुळे बंद आहे. या रस्त्यामुळे अनेक कुटुंबांचे दैनंदिन जीवन अडचणीत आले आहे. हा रस्ता खुला करण्यासाठी १ डिसेंबर २०२४, ४ फेब्रुवारी २०२५ व ११ ऑगस्ट २०२५ रोजी प्रशासनाकडे लेखी निवेदने देण्यात आली. ११ ऑगस्ट २०२५ नंतर तर १५ ऑगस्टपर्यंत रस्ता मोकळा करण्याचे लेखी आश्वासनही देण्यात आले होते. मात्र महिनोन्‌महिने उलटूनही प्रत्यक्षात एकही पाऊल उचलले गेले नाही.

प्रशासनाने आमची सरळसरळ फसवणूक केली आहे, असा थेट आरोप करत, रस्ता खुला होईपर्यंत उपोषण सुरूच राहणार असल्याचा निर्धार उपोषणकर्त्यांनी व्यक्त केला आहे. मुख्यमंत्री कार्यालय, जिल्हाधिकारी बुलढाणा व तहसीलदार लोणार यांनी तातडीने दखल घ्यावी, अशी मागणी करण्यात आली असून, उपोषणादरम्यान काहीही अनुचित घडल्यास त्याची सर्वस्वी जबाबदारी प्रशासनावर राहील, असा कडक इशाराही देण्यात आला आहे.

spot_img

Related Articles

लोकप्रिय

error: Content is protected !!