spot_img
spot_img

बुलढाणा जिल्हा सामान्य रुग्णालयातील भ्रष्टाचार प्रकरणात ACB चौकशी सुरू होणार?

बुलढाणा (हॅलो बुलडाणा) जिल्हा सामान्य रुग्णालयातील साहित्य खरेदी व विक्रीत मोठ्या प्रमाणावर भ्रष्टाचार झाल्याच्या तक्रारींवर आता प्रशासकीय आणि कायदेशीर हालचालींना वेग आला आहे. देऊळगाव राजा येथील सामाजिक कार्यकर्ते चंद्रकांत ज्ञानदेव खरात यांनी या प्रकरणी अनेकदा तक्रारी नोंदवल्या आहेत. त्यानंतर सामान्य प्रशासन विभागाने (GAD) सार्वजनिक आरोग्य विभागाला तातडीने कार्यवाही करण्याचे आदेश दिले आहेत.

महत्त्वाचे म्हणजे, लाचलुचपत प्रतिबंधक विभाग (ACB) या प्रकरणात सक्रिय झाला असून जिल्हा शल्य चिकित्सक आणि २१ अधिकाऱ्यांविरुद्ध भ्रष्टाचार प्रतिबंधक अधिनियम १९८८ च्या कलम १७-अ अंतर्गत चौकशी करण्याची परवानगी मागितली आहे. परंतु, आरोग्य विभागाने अद्याप कोणताही निर्णय दिलेला नाही. ACB ने स्मरणपत्र पाठवून या तक्रारीवर निर्णय आणि चौकशीस परवानगी कधी मिळणार, याची माहिती मागितली आहे.

खरात यांनी थेट अधिकाऱ्यांवर भ्रष्टाचाराचे आरोप केले असून, परवानगी मिळाल्यास बुलढाणा आरोग्य विभागातील अनेक वरिष्ठ अधिकाऱ्यांची स्थिती गंभीर होण्याची शक्यता आहे. प्रशासन आणि ACB या प्रकरणात आता निर्णायक टप्प्यावर असून, भ्रष्टाचाराचा पर्दाफाश होणार की केवळ ढोंगी दाखले राहणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

spot_img

Related Articles

लोकप्रिय

error: Content is protected !!