सिंदखेडराजा (हॅलो बुलढाणा) सिंदखेडराजा तहसील कार्यालयात शासनाने डॉ.आस्मा मुजावर यांची देऊळगाव राजावरून सिंदखेड राजा येथे निवासी नायब तहसीलदार म्हणून बदली केली. दरम्यान त्या रुजू होताच त्यांनी कामकाजाला धडाकेबाज सुरुवात करत दोन आठवड्यात तब्बल 2 हजार 400 प्रमाणपत्र निकाली काढले आहे.
त्यांच्या या कार्यतत्परतेमुळे विद्यार्थी आणि शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला
आहे.विशेष म्हणजे सुट्टीच्या दिवशीही कार्यालयात येऊन विद्यार्थ्यांना कोणती अडचण निर्माण होऊ नये म्हणून त्यांच्या दाखल्यावर डिजिटल सिग्नेचर करतात. त्यामुळे तात्काळ दाखले मिळत आहे.नायब तहसीलदार डॉ.आसमा मुजावर यांची धडाकेबाज महिला अधिकारी म्हणूनओळख आहे. त्यांनी अवैध रेती प्रकरणी अनेक कारवाया केल्या आहेत.
▪️दलालामार्फत कोणीही येऊ नये
डॉ.आसमा मुजावर यांचे आवाहन केले की,
आलेल्या प्रत्येक व्यक्तीचे दाखले ताबडतोब काढून देण्यात येत आहे.त्यामुळे लाभार्थ्यांनी दलालामार्फत येऊ नये विशेष म्हणजे दवाखान्याच्या कामासाठी तात्काळ उत्पन्नाचे दाखले काढून देण्यात येतात काही अडचण असल्यास लाभार्थ्यांनी प्रत्यक्ष भेटावे,असे आवाहन देखील ना. तहसीलदार डॉ असमा मुजावर यांनी केले.