spot_img
spot_img

लायसन्स देण्याची प्रथा कडक करा – बुलढाणा अर्बनचे संस्थापक अध्यक्ष राधेश्याम चांडक यांची ठाम मागणी

बुलढाणा (हॅलो बुलढाणा) बुलढाण्यात वाढत्या रस्ते अपघातांनी चिंता वाढवली असताना, 37 व्या राष्ट्रीय सुरक्षा सप्ताहाच्या निमित्ताने सार्वजनिक बांधकाम विभाग व बुलढाणा अर्बनच्या संयुक्त विद्यमाने बस स्थानक परिसरात भव्य जनजागृती कार्यक्रम पार पडला. 1 ते 31 जानेवारीदरम्यान राबविण्यात येणाऱ्या या सप्ताहाचा उद्देश केवळ औपचारिकता नसून, अपघातांवर ठोस अंकुश ठेवणे हाच असल्याचे यावेळी स्पष्ट झाले.

कार्यक्रमाची सुरुवात शहरातून काढण्यात आलेल्या जनजागृती रॅलीने झाली. त्यानंतर आयोजित सभेत जिल्हा मुख्यालयातील अधिकारी व कर्मचाऱ्यांनी वाहतूक नियमांचे काटेकोर पालन करण्याची शपथ घेतली. यावेळी सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता जितेंद्र काळे, बुलढाणा अर्बनचे सर्वेसर्वा राधेश्याम चांडक (भाईजी), जिल्हाधिकारी डॉ. किरण पाटील, पोलीस अधीक्षक निलेश तांबे, गुन्हे शाखेचे सुनील अंबुलकर, शहर ठाणेदार रवी राठोड यांच्यासह अनेक अधिकारी उपस्थित होते.

यावेळी बोलताना राधेश्याम चांडक यांनी आक्रमक भूमिका घेतली. रस्ते अपघातांमध्ये मृत्युमुखी पडणाऱ्यांमध्ये तरुणांचे प्रमाण धक्कादायक आहे. आपण पाश्चात्य संस्कृती स्वीकारतो, मात्र तिथल्या शिस्तबद्ध व्यवस्थेकडे दुर्लक्ष करतो. इतर देशांप्रमाणे लायसन्स देण्याची कडक, पारदर्शक आणि जबाबदार पद्धत भारतातही राबवली पाहिजे. केवळ कागदोपत्री लायसन्स देऊन अपघात थांबणार नाहीत, असा थेट इशारा त्यांनी दिला.

spot_img

Related Articles

लोकप्रिय

error: Content is protected !!