spot_img
spot_img

वृक्षारोपणात सर्वच घटकांची भूमिका महत्वाची : आ.संजय गायकवाड -निमा संघटना,सेव्ह वसुंधराचा पुढाकार – जिल्हा क्रीडा संकुल परिसरात वृक्ष लागवड

बुलढाणा (हॅलो बुलढाणा) फक्त वृक्षारोपण करून चालणार नाही, तर त्यांचं संवर्धन सुद्धा करणं, ही काळाची गरज आहे. वृक्षारोपणात सर्वच घटकांची भूमिका महत्वाची आहे, असे विचार आमदार संजय गायकवाड यांनी येथे आज व्यक्त केले.

जागतिक पर्यावरण दिवस तसेच राष्ट्रीय डॉक्टर दिवसच्या निमित्याने जिल्हा क्रीडा संकुल बुलढाणा येथे निमा संघटना बुलढाणा व सेव्ह वसुंधरा टीम मिळून वृक्षारोपण करण्यात आले.या वेळी आमदार संजय गायकवाड याच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले. या वेळी केंद्रीय निमाचे पदाधिकारी डॉ गजानन पडघान ,डॉ वैशाली पडघान, महाराष्ट्र निमाचे कोषाध्यक्ष डॉ सोपान खर्चे यांची उपस्थिती होती.डॉ विद्या घोंगटे यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले. या्प्रसंगी निमा संघटनेचे सदस्य डॉ चंद्रकिरण पवार, डॉ सचिन सरकाटे,डॉ शुभदा उचाडे,डॉ सुप्रिया वाघमारे, डॉ माधवी जवरे,डॉ अनुश्री पवार उपस्थिती होत्या. तसेच सेव्ह वसुंधरा टीमेच्या सदस्या शीतल सोनुने, सुलभा पाटील,वैदेही दलाल, सीमा सरदार, मनोरमा जयस्वाल, रेणुका कुलकर्णी, रितू कनोजिया , आर्या दलाल उपस्थित होत्या, सामाजिक कार्यात नेहमीच अग्रेसर असणारे कमलेश कोठारी व मनीषा कोठारी यांनी झाडें उपलब्ध करून दिली.

spot_img

Related Articles

लोकप्रिय

error: Content is protected !!