spot_img
spot_img

मेहकर तालुक्यातील उद्धवा विठ्ठलवाडी ग्रामपंचायतीत खळबळ; उपसरपंचांविरोधात अविश्वास ठराव दाखल

मेहकर (हॅलो बुलडाणा/ अनिल राठोड) तालुक्यातील उद्धवा विठ्ठलवाडी ग्रामपंचायतीत सत्ताकारण तापले असून उपसरपंच रमेश केशवराव खोडके यांच्याविरोधात अविश्वास ठराव सादर करण्यात आल्याने राजकीय वातावरण चांगलेच ढवळून निघाले आहे. सरपंच धनराज राठोड यांच्यासह सात ग्रामपंचायत सदस्यांनी थेट तहसीलदारांकडे लेखी अर्ज देत उपसरपंचांच्या कार्यपद्धतीवर गंभीर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे.

उपसरपंचांच्या मनमानी कारभारामुळे ग्रामपंचायतीच्या कामकाजात अडथळे निर्माण होत असून सदस्यांचा त्यांच्यावरचा विश्वास पूर्णतः उडाल्याचा आरोप अर्जात करण्यात आला आहे. महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियम 1959 च्या कलम 35 अंतर्गत विशेष सभा बोलावून अविश्वास ठराव घेण्याची ठाम मागणी करण्यात आली आहे.या घडामोडीमुळे गावाच्या राजकारणात प्रचंड खळबळ उडाली असून आता तहसील प्रशासन कोणती कारवाई करते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

spot_img

Related Articles

लोकप्रिय

error: Content is protected !!