मेहकर (हॅलो बुलडाणा) मुंबईत झालेल्या महानगरपालिका निवडणुकीत मेहकरचे दमदार आमदार सिद्धार्थ खरात यांनी पुन्हा एकदा आपला राजकीय प्रभाव सिद्ध केला आहे. विक्रोळी पार्क साईट येथील वार्ड क्रमांक १२३ आणि १२४ मधून शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे उमेदवार सुनिल मोरे आणि सकीना खान व धर्मेंद्र काळे वार्ड क्रमांक २६ यांनी शिवसेना (शिंदे गटाच्या) उमेदवारांचा दणदणीत पराभव केला आहे.
या विजयावर प्रतिक्रिया देताना आमदार सिद्धार्थ खरात म्हणाले, “मी मुंबईत प्रचार करताना ठामपणे सांगितले होते की १६ तारखेला मला विजयाचा फोन येईल. आज खरोखर तो फोन आला आणि दोन्ही उमेदवार विजयी झाल्याची बातमी मिळाली. मनापासून आनंद वाटतो.” आमदार खरात यांनी विजयी उमेदवारांचे जाहीर अभिनंदन करताना विरोधकांनाही अप्रत्यक्ष राजकीय चपराक दिली.हा निकाल म्हणजे केवळ दोन वॉर्डांचा विजय नसून, ठाकरे गटाच्या वाढत्या ताकदीचा आणि आमदार सिद्धार्थ खरात यांच्या दमदार नेतृत्वाचा व प्रभावी प्रचाराचा थेट परिणाम असल्याचे राजकीय वर्तुळात बोलले जात आहे.











