spot_img
spot_img

अवघ्या तीन महिन्यांत वाकी बु. जि.प.शाळेचा कायापालट; ‘मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा’त ठरली आदर्श!

देऊळगाव राजा (हॅलो बुलडाणा/संतोष जाधव) जिल्हा परिषद शाळांची ओळख बदलू शकते, हे वाकी बुद्रुक येथील जि.प. मराठी उच्च प्राथमिक शाळेने अवघ्या तीन महिन्यांत सिद्ध करून दाखवले आहे. ऑनलाईन बदल्यांनंतर नव्याने रुजू झालेल्या महिला मुख्याध्यापिका विद्या ढवळे-गायकवाड व त्यांच्या सहकारी शिक्षकांनी “नवा गडी, नवा राज” ही म्हण प्रत्यक्षात उतरवत शाळेला अक्षरशः बोलके रूप दिले आहे.

‘मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा’ अभियानाच्या तिसऱ्या टप्प्यात सहभागी होताना अनेक अडचणी होत्या. मात्र जिद्द, नियोजन आणि प्रामाणिक प्रयत्नांच्या जोरावर शाळेचा चेहरामोहरा बदलण्यात आला. ई-लर्निंग, सेमी इंग्लिश, बोलक्या भिंती, वाचनासाठी बोलकी फळे, स्वतंत्र वाचनालय, स्वच्छ पिण्याचे पाणी, मध्यान्ह भोजनासाठी बैठक व्यवस्था, प्रकाश–पंखे, आरोग्य तपासणी, स्वतंत्र शौचालये, रोजचा कचरा व्यवस्थापन अशा सुविधा शाळेत उभ्या राहिल्या आहेत.

त्याचबरोबर परसबागेतून पालेभाज्या, कांदा, लसूण, टोमॅटो, फुले फुलत असून शाळा निसर्गरम्य झाली आहे. दि. १५ जानेवारी रोजी गटविकास अधिकारी मुकेश माहोर व शिक्षण विस्तार अधिकारी बबन कुमठे यांनी शाळेला भेट देत समाधान व्यक्त केले.

spot_img

Related Articles

लोकप्रिय

error: Content is protected !!