spot_img
spot_img

बुलढाण्यात जड वाहनांसाठी खास नंबर! 0001 ते 9999 – आजच संधी! RTO ची मोठी घोषणा!

बुलढाणा (हॅलो बुलडाणा)  जड वाहनधारकांसाठी उप प्रादेशिक परिवहन कार्यालयाकडून महत्त्वाची घोषणा करण्यात आली आहे. जड वाहनांसाठी पसंती क्रमांकाकरिता MH28 CF ही नवीन मालिका सुरू करण्यात येत असून, ती दि. 19 जानेवारी 2026 पासून उपलब्ध होणार आहे. या मालिकेत 0001 ते 9999 पर्यंतचे आकर्षक आणि पसंतीचे क्रमांक वाहनधारकांना मिळणार आहेत.

पसंती क्रमांक मिळवण्यासाठी वाहनधारकांनी शासनाने ठरवलेल्या नियमांनुसार अधिकृत प्रक्रियेद्वारे अर्ज करणे आवश्यक आहे. या सेवेसाठी निश्चित शुल्क आकारण्यात येणार असून, क्रमांकांचे वाटप पारदर्शक व नियमानुसार केले जाणार आहे.

विशेष क्रमांकामुळे वाहनाची ओळख वेगळी ठरण्याबरोबरच व्यावसायिक प्रतिष्ठाही वाढते. त्यामुळे इच्छूक जड वाहनधारकांनी या सुविधेचा लाभ घ्यावा, असे आवाहन उप प्रादेशिक परिवहन अधिकारी रघुवीर सिंग बिलावर यांनी केले आहे.

spot_img

Related Articles

लोकप्रिय

error: Content is protected !!