spot_img
spot_img

संताच्या साहित्य अभ्यासासाठी बार्टी संशोधन उपकेंद्र सुरू करा – काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ

देऊळगाव राजा (हॅलो बुलडाणा/ संतोष जाधव) विठ्ठलाचे समकालीन तल्लीन भक्त श्री संत चोखामेळा यांचे साहित्य हे बाह्य रुपावर न जाता अंतरर्भावाचे महत्व सांगणारे आहे. “ऊस डोंगा परी रस नोहे डोंगा” विद्रोही संत चोखामेळा यांनी समाजातील लोकांसाठी देवासमोर समानतेची मागणी केली अशा या संताचे विचार साहित्य हे सर्वाना आत्मसात करता आले पाहिजे यासाठी महाराष्ट्र सरकार ने बार्टी संशोधन केंद्राच्या धर्तीवर संत चोखामेळा यांच्या जन्मस्थळी मेहुणाराजाला बार्टी संशोधन उपकेंद्र सुरू करण्यात यावे असे विचार काँग्रेस प्रदेशाध्यक्ष तथा संत चोखामेळा जन्मोत्सवाचे मुख्य प्रवर्तक हर्षवर्धन सपकाळ यांनी संत चोखामेळा यांच्या 758 व्या जयंती उत्सव सोहळ्याप्रसंगी केले. या कार्यक्रमाचे अध्यक्ष काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ होते. तर प्रमुख अतिथी माजी मंत्री डॉ. राजेंद्र शिंगणे, संत चोखामेळा अभ्यासक प्रा. कमलेश खिल्लारे, जिल्हा परिषद माजी उपाध्यक्ष गंगाधर जाधव,माजी जिल्हा परिषद बाबुराव नागरे,राष्ट्रवादी उपाध्यक्ष प्रकाश गिते, राष्ट्रवादी नेते संतोष खांडेभराड, दिलीपकुमार झोटे, रिपाईचे भाई दिलीप खरात, काँग्रेस नेते रमेश कायंदे,माजी जि. प.सदस्य भगवान मुंढे, गजानन पवार, राजेश इंगळे, अशोक पडघान, प्रवीण गिते, गजानन काकड, सुनिल शेजूळकर,दिपक चेके, दिलीप सानप, सरपंच मंदा बोन्द्रे विष्णू झोरे यांची प्रामुख्याने उपस्थिती होती. पुढे बोलतांना सपकाळ म्हणाले की विद्रोही संत चोखामेळा यांचा पुण्यतिथी सोहळा हा पंढरपूर येथे साजरा करावा. संत चोखामेळा जन्मोत्सव हा लोकउत्सोव व्हावा ही गेल्या अनेक वर्षांपासून मनात खंत होती पण आज याठिकाणी मोठ्याप्रमाणात गर्दी खऱ्या अर्थाने लोकोत्सव झाला असल्याचे आनंद व्यक्त केला. याप्रसंगी माजी मंत्री डॉ. राजेंद्र शिंगणे मनोगत करताना म्हणाले की, संतानी कधीचं जात धर्म पंथ पाहिले नाही त्यांनी संताचे विचार हे मानाव जातीला समृद्ध करणारे होते. आपण सर्वांनी त्यांच्या विचारांचा जागर करून एकत्र नांदवे असे विचार व्यक्त केले. त्याचबरोबर संत चोखामेळा साहित्याचे गाढे अभ्यासक प्रा. कमलेश खिल्लारे यांनी विचार सांगताना म्हणाले मानाव कल्याणासाठी संतांनी आपलं आयुष्य वेचलं त्याचे विचार हे आजच्यापिढीला प्रेरणादायी ठरत असल्याचे मत व्यक्त केले. या जन्मोत्सवासाठी महिला व नागरिकांची मोठ्याप्रमाणात गर्दी होती. कार्यक्रमाचे प्रास्ताविक गटविकास अधिकारी मुकेश माहोर यांनी केले तर सूत्रसंचालन गटशिक्षणाधिकारी दादाराव मसूदवाले, व्ही. एस. जाधव यांनी केले तर आभार राष्ट्रवादीचे युवानेते गजानन काकड यांनी मानले.

spot_img

Related Articles

लोकप्रिय

error: Content is protected !!