रायपूर (हॅलो बुलडाणा/सचिन जयस्वाल) जानेवारी २०२६स्व. मंजुळाई कोरडे पाटील ग्रामीण विकास बहुउद्देशीय संस्था, रायपूर द्वारा संचालित श्री शिवाजी विद्यालय रायपूर येथे वार्षिक स्नेहसंमेलन व पारितोषिक वितरण सोहळा २०२५–२०२६ मोठ्या उत्साहात पार पडला. संस्थेच्या अध्यक्षा सौ. मीनाताई कोरडे पाटील यांच्या हस्ते सांस्कृतिक कार्यक्रमांचे दिमाखदार उद्घाटन झाले. प्रमुख पाहुणे म्हणून संस्थेचे सचिव मा. श्री एकनाथरावजी कोरडे पाटील यांनी उपस्थिती स्वीकारत विद्यार्थ्यांना प्रेरणादायी मार्गदर्शन केले.
पारितोषिक वितरण समारंभासाठी रायपूर पोलीस स्टेशनचे पीएसआय पाटील साहेब प्रमुख पाहुणे म्हणून लाभले. कार्यक्रमाला संस्थेचे संचालक, ग्रामपंचायत पदाधिकारी, माजी सरपंच, डॉक्टर, व्यापारी, सामाजिक कार्यकर्ते, पालकवर्ग व गावातील मान्यवरांची मोठी उपस्थिती होती. विशेष म्हणजे दोन्ही दिवस महिलांची आणि पालकांची लक्षणीय गर्दी पाहायला मिळाली.
वर्ग ५ ते १० च्या विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या नृत्य व नाटिकांनी उपस्थितांची मने जिंकली. सुत्रसंचालन जी. एन. जाधव सर यांनी केले. प्रास्ताविक व्ही. व्ही. सपकाळ यांनी तर आभार प्रदर्शन मुख्याध्यापक एस. पी. नप्ते यांनी केले. शिक्षकवृंद व कर्मचाऱ्यांच्या अथक परिश्रमामुळे कार्यक्रम अत्यंत शिस्तबद्ध व उत्साहपूर्ण वातावरणात यशस्वी ठरला.











