डोणगाव (हॅलो बुलडाणा) डोणगाव पोलीस स्टेशनपासून अवघ्या काही अंतरावर घडलेल्या या दुर्घटनेत चिखली तालुक्यातील राऊतवाडी येथील युवक सतीश बाबुराव निकाळजे यांचा जागीच दुर्दैवी मृत्यू झाला. अपघातग्रस्त वाहन क्रमांक MH 26 AD 2586 असून अपघाताची तीव्रता इतकी भीषण होती की वाहनाचा चक्काचूर झाला आणि मृतकाचा चेहरा पूर्णतः विद्रूप झाला.
घटनेचे दृश्य इतके भयावह होते की घटनास्थळी उपस्थित नागरिक हादरून गेले. माहिती मिळताच डोणगाव पोलीस तात्काळ दाखल झाले. पोलीस कॉन्स्टेबल हर्ष सहगल, पवन गावणे व गोविंदा खंडागळे यांनी प्रसंगावधान राखत वाहतूक सुरळीत केली व मृतदेह ताब्यात घेतला. काही काळ महामार्गावरील वाहतूक पूर्णतः ठप्प झाली होती.











