spot_img
spot_img

आत्महत्येस प्रवृत्त केल्याच्या आरोपातून सहा आरोपींची निर्दोष मुक्तताः आरोपीचा नावांची लिहून ठेवली होती चिट्ठी

बुलढाणा (हॅलो बुलडाणा) आत्महत्येस प्रवृत्त केल्याच्या गंभीर प्रकरणाचा निकाल अखेर लागला असून,अतिरिक्त सत्र न्यायालय, बुलढाणा यांनी सहा आरोपींना सर्व आरोपांतून निर्दोष मुक्त केले आहे. भावनिक आरोप, अंदाज आणि तर्कावर उभा राहिलेला हा खटला न्यायालयात टिकू शकला नाही, हे या निकालाने स्पष्ट झाले आहे.

मुलीच्या प्रेमप्रकरणामुळे मानसिक तणावात असलेल्या प्रकाश यांनी ३० जानेवारी २०१९ रोजी आत्महत्या केली होती. घटनेनंतर नातेवाईकांनी आरोपींवर धमकी व मानसिक छळ केल्याचा आरोप करत भादंवि कलम ३०६, ५०६ व ३४ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला होता. मात्र,फक्त नाव लिहिलेली चिठ्ठी किंवा मानसिक तणाव हे आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा ठोस पुरावा ठरत नाही, हे न्यायालयाने ठणकावून सांगितले.

सुनावणीदरम्यान बचाव पक्षाचे ज्येष्ठ विधिज्ञ अॅड. अजय दिनोदे यांनी प्रभावी युक्तिवाद करत आत्महत्येस थेट प्रवृत्त करणारी कोणतीही ठोस कृती आरोपींकडून झाल्याचा पुरावा नसल्याचे स्पष्ट केले. न्यायालयाने हा युक्तिवाद ग्राह्य धरत सर्व आरोपींची निर्दोष मुक्तता केली.

spot_img

Related Articles

लोकप्रिय

error: Content is protected !!