spot_img
spot_img

मेहकरमध्ये ‘डिफेंडर राज’ – किशोर गारोळेंची जबरदस्त एन्ट्री! ‘हात दाखवा, गाडी थांबवा’ – जनसेवेचा भाव अनुभवायला मिळतो!

मेहकर (हॅलो बुलढाणा) मेहकर नगरपरिषदेच्या नगराध्यक्षपदाचा पदभार स्वीकारताना किशोर गारोळे यांनी केलेली ‘डिफेंडर एन्ट्री’ म्हणजे केवळ थाटामाट नव्हे, तर आत्मविश्वास, ठाम नेतृत्व आणि विकासाचा निर्धार यांची जाहीर घोषणा आहे. ‘क’ वर्ग नगरपालिकेचा शिक्का दाखवून टीका करणाऱ्यांना किशोरभाऊंनी एका झटक्यात संदेश दिला आहे.पद लहान असू शकतं, पण दृष्टी मोठी असते

डिफेंडरसारख्या दमदार, सुरक्षित आणि ताकदवान वाहनातून नगराध्यक्षपदाची सूत्रे हाती घेणं हे दिखाव्यासाठी नसून, वर्षानुवर्षे दुर्लक्षित राहिलेल्या मेहकरसाठी सज्ज असलेल्या नेतृत्वाचं प्रतीक आहे. रस्ते, पाणीपुरवठा, स्वच्छता, आरोग्य आणि मूलभूत सुविधा याबाबत ठोस आराखडा तयार असून पहिल्याच दिवसापासून कामाला लागण्याचा त्यांचा निर्धार दिसतो आहे.

डिफेंडर कारवर टीका करणाऱ्यांनी हे लक्षात घ्यावं की, शहराचं भविष्य नेत्याच्या वाहनावर नाही तर त्याच्या निर्णयक्षमतेवर ठरतं. किशोर गारोळे यांचा आजवरचा प्रवास पाहता, कामात तडजोड न करणारा आणि जबाबदारी समर्थपणे पेलणारा नेता अशीच त्यांची ओळख आहे.

‘1777’ क्रमांकाची ही डिफेंडर कार “हात दाखवा, गाडी थांबवा” या जनसेवेच्या भावनेचं प्रतीक ठरत आहे. संपर्कप्रमुख नरेंद्र खेडेकर, आमदार सिद्धार्थ खरात, शिवसेना पदाधिकारी, नगरसेवक व कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत काल पदभार स्वीकारताना शहरात उत्साहाचं वातावरण होतं.

बुलढाणा जिल्ह्यात दुसऱ्यांदा दाखल झालेली ही बुलेटप्रूफ, पाण्यातून चालणारी ‘डिफेंडर’ कार नागरिकांमध्ये कुतूहलाचा विषय ठरली आहे. आज ‘डिफेंडर एन्ट्री’ चर्चेत असली, तरी उद्या विकासाचा वेग, ठोस निर्णय आणि जनहिताचा कारभार हीच किशोर गारोळेंची खरी ओळख ठरणार आहे.

spot_img

Related Articles

लोकप्रिय

error: Content is protected !!