चिखली (हॅलो बुलडाणा/ सय्यद साहिल) पोलीस स्टेशनचे ठाणेदार भूषण गावंडे यांनी 31 डिसेंबरच्या नशेच्या संस्कृतीला थेट आव्हान देत समाजभान जागवणारा अनोखा उपक्रम राबवला आहे. नववर्षाच्या स्वागतासाठी दारूच्या बाटल्यांकडे धाव घेणाऱ्यांसाठी चिखली पोलिसांनी चक्क मोफत दूध वाटप सुरू केले. ‘दारू नको, दूध घ्या’ हा संदेश देत पोलिसांनी मद्यपानाच्या विरोधात आक्रमक सामाजिक भूमिका घेतली आहे.
31 डिसेंबरला दारूच्या नशेत अपघात, भांडणे व गुन्हेगारी वाढते; मात्र यावर्षी चिखली पोलिसांनी प्रतिबंधात्मक उपायांसोबतच सकारात्मक पर्याय दिला आहे. दूध वाटपातून आरोग्य, शुद्ध विचार व कुटुंबकेंद्री मूल्यांचा संदेश देण्यात आला. या उपक्रमाला नागरिकांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असून, पोलिसांचा हा आगळा-वेगळा उपक्रम संपूर्ण जिल्ह्यात चर्चेचा विषय ठरला आहे.










