spot_img
spot_img

समृद्धी महामार्गावर थरकाप! खासदार प्रतापराव जाधव यांच्या कारचा भीषण अपघात; तिघे गंभीर

बुलढाणा (हॅलो बुलडाणा) बुलढाण्याचे खासदार तथा केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री प्रतापराव जाधव यांच्या कारला काल रात्री समृद्धी महामार्गावर वाशिम जिल्ह्यातील मालेगावजवळ भीषण अपघात झाला. हा अपघात इतका जबरदस्त होता की काही काळ महामार्गावर एकच खळबळ उडाली.

केंद्रीय मंत्री प्रतापराव जाधव हे नागपूर विमानतळावर पोहोचून गेल्यानंतर त्यांच्या ताफ्यातील कारमधून हे तिघे मंत्री जाधव यांचे अंगरक्षक, सहकारी आणि कारचालक मेहकरकडे परतत असताना हा अपघात घडला. रात्री उशिरा झालेल्या या अपघातामुळे परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले.

अपघातात कारचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून कारमधील तिघेही जण गंभीर जखमी झाले आहेत. घटनेची माहिती मिळताच मदतकार्याला वेग देण्यात आला. जखमींना तातडीने वाशिम येथील एका खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांच्यावर सध्या उपचार सुरू आहेत.

समृद्धी महामार्गावर सातत्याने घडणाऱ्या अपघातांमुळे सुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. या घटनेमुळे राजकीय व प्रशासकीय वर्तुळातही चिंता व्यक्त केली जात आहे. सुदैवाने केंद्रीय मंत्री प्रतापराव जाधव या अपघातात प्रवासात नसल्याने मोठा अनर्थ टळला आहे.

spot_img

Related Articles

लोकप्रिय

error: Content is protected !!