spot_img
spot_img

न्यायालयाच्या तोंडावर बुलडाण्यात भूमाफियागिरीचा उन्माद! ओएसडीच्या छत्रछायेत शेतजमीन बळकावण्याचा धक्कादायक प्रकार!

बुलढाणा (हॅलो बुलढाणा) जिल्ह्यात शासकीय पदाचा गैरवापर, महसूल यंत्रणेशी संगनमत आणि पोलीस यंत्रणेची रहस्यमय उदासीनता यांच्या बळावर न्यायप्रविष्ट शेतजमीन हडप करण्याचा गंभीर प्रकार उघडकीस आला आहे.ना.संजय शिरसाट यांचा ओएसडी म्हणून कार्यरत असलेल्या सिध्दार्थ भंडारे याने आपल्या मावसभाऊ महेंद्र नारायण राऊत यांच्या नावाने १४ एक्कर सामुहिक न्यायप्रविष्ठ असलेली वादग्रस्त शेतीची खरेदी दाखवून संपूर्ण यंत्रणेलाच आव्हान दिले आहे.

संबंधित शेतीवर बुलडाणा ग्रामसेवा सहकारी संस्था र.नं.५५४ कडे तारण असताना देखील दुय्यम निबंधक यांनी संगनमताने खरेदीदस्त नोंदविल्याचा आरोप आहे.यावर हरकत व अपील प्रलंबित असताना,बहुचर्चित मंडळ अधिकारी विजय टेकाळे यांनी नियमबाह्य दिलेल्या केवळ सातबाऱ्यावर नाव आले म्हणून महेंद्र राऊत याने शासकीय मोजणी व पोलीस बंदोबस्तासाठी अर्ज केला.मात्र प्रकरण न्यायप्रविष्ट असल्याने महसूल प्रशासन व जिल्हा पोलीस अधीक्षकांनी स्पष्ट नकार दिला.
तरीही दि.०२ जुलै २०२५ रोजी दुपारी १ वाजता जेसीबी, ट्रक, ट्रॅक्टर, २४ जणांचा जमाव व बाऊंसर घेऊन शेतात जबरदस्ती घुसखोरी करण्यात आली. पेरलेल्या पिकांची नासधूस,सिमेंटचे खांब, तार कंपाऊंड व टिनशेड उभारून थेट अतिक्रमण करण्यात आले.विशेष म्हणजे याबाबत तक्रार देण्यासाठी गेलेल्या पीडित राहुल तारे परीवार शेतकऱ्याची तक्रार ग्रामीण पोलीस स्टेशनने घेण्यास टाळाटाळ केली.

डीवायएसपी स्तरावर हस्तक्षेप होऊनही आजतागायत कोणतीही ठोस कारवाई झालेली नाही. शासकीय पदाच्या जोरावर आप्तेष्टांच्या नावे अफाट चल अचल संपत्ती जमवून भूमाफियागिरी करणाऱ्या सिध्दार्थ भंडारेवर कठोर कारवाई होणार की पुन्हा एकदा ‘सत्ताधाऱ्यांचा माणूस’ वाचणार? असा सवाल आता सर्वसामान्य बुलढाणेकर विचारत आहेत.

नियमबाह्य खरेदी व अर्धवट दस्तावेज १४ एक्कर जमीन प्रकरणात जो कोणी दोषी आढळला त्याची महसूल विभाग व पोलीस प्रशासनाने उच्चस्तरीय चौकशी करून पीडित राहुल तारे यांना न्याय मिळवून द्यावा व दोषींवर फोजदारी स्वरूपाचे गुन्हे करावे अशी मागणी पीडित तारे परीवार प्रशासनाकडे करीत आहे जो पर्यंत पीडित तारे परिवाराला न्याय मिळत नाही तो पर्यंत आम्ही त्यांनी दिलेल्या प्रत्येक पत्रव्यवहाराची बातमी लेखणीतून संबंधित प्रशासनाकडे मांडत राहु

spot_img

Related Articles

लोकप्रिय

error: Content is protected !!