spot_img
spot_img

21 वर्षीय गर्भवती साधनाची विहिरीत आत्महत्या; सासरचा छळ ठरला जीवघेणा, पती नगरमध्ये फरार, अखेर पोलिसांनी खेचून आणला!

मेहकर (हॅलो बुलडाणा) सासरच्या अमानुष छळाला कंटाळून 21 वर्षीय गर्भवती विवाहितेने विहिरीत उडी मारून आत्महत्या केल्याची हृदयद्रावक घटना बुलढाणा जिल्ह्यातील मेहकर तालुक्यातील माळेगाव येथे घडली. साधना विष्णू चोडकर असे मृत तरुणीचे नाव असून या घटनेने संपूर्ण परिसर हादरून गेला आहे.

मृत साधनाचे 2024 साली विवाहबंधन झाले होते. अवघ्या काही महिन्यांतच तिच्यावर सासरच्या मंडळींकडून मानसिक व शारीरिक छळ सुरू असल्याचा गंभीर आरोप माहेरच्या नातेवाईकांनी केला आहे. 23 डिसेंबरच्या सकाळी गावातील सार्वजनिक विहिरीत साधनाने उडी घेत आत्महत्या केली. ही बाब समजताच माहेरच्या नातेवाईकांनी माळेगाव गाठले आणि घटनास्थळी एकच आक्रोश उसळला.

जोपर्यंत आरोपींना अटक होत नाही, तोपर्यंत मृतदेह ताब्यात घेणार नाही, अशी ठाम व आक्रमक भूमिका माहेरच्या नातेवाईकांनी घेतली. यामुळे परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले. परिस्थिती हाताबाहेर जात असल्याचे लक्षात येताच पोलिसांनी तातडीने तपासाची चक्रे फिरवली.

प्रकरणाची गंभीर दखल घेत पोलिसांनी साधनाच्या सासू-सासऱ्यांना तात्काळ अटक केली. दरम्यान, घटनेनंतर बेपत्ता झालेला पती विष्णू रामाभाऊ चोडकर याचा मोबाईल लोकेशन ट्रॅक करत त्याला थेट नगर येथून अटक करण्यात आली. आरोपींच्या अटकेची खात्री पोलिसांनी व्हिडिओ कॉलद्वारे नातेवाईकांना दिल्यानंतरच दुपारी सुमारे 4 वाजता मृतदेह ताब्यात घेण्यात आला.

spot_img

Related Articles

लोकप्रिय

error: Content is protected !!