बुलढाणा (हॅलो बुलढाणा) कुणी म्हटले बुलढाण्यातील अत्यंत खराब रस्ता कोणता ? तर माळ विहीर ग्रामपंचायतच्या हद्दीत येणाऱ्या वृंदावन नगराकडे आपुसकच बोट जाते. या वृंदावन नगरातील रस्त्याची एवढी दयनीय अवस्था झाली की, या रस्त्यावरून रहिवाशांना दुचाकी गाडी सुद्धा चालविता येत नाही. ग्रामपंचायतच्या दुर्लक्षामुळे येथील रहिवासी खराब रस्त्यामुळे नारक् यातना भोगत आहेत.
माळ विहीर ग्रामपंचायत हद्दीत वृंदावन नगर येते. परंतु या नगरात एक अर्धवट सिमेंट रस्ता आहे. पुढे मात्र गटारगंगा साचली आहे. या रस्त्यावरून रात्री जाणे म्हणजे जीव धोक्यात घालने आहे. नागरिकांनी मोठ-मोठी घरे बांधली.त्यांना वाटले की,आपल्या समस्या सुटतील पण सत्तेत आलेल्यांनी वृंदावन नगरा कडे साफ दुर्लक्ष केले असून, उलट समस्या वाढल्या आहेत, याचे ताजे उदाहरण म्हणजे येथील रस्त्याची दयनीय परिस्थिती.. खरे तर मूलभूत सुविधा सोडविण्यासाठी ग्रामपंचायत प्रशासन असते. परंतु माळ विहीर ग्रामपंचायत पूर्णपणे अपयशी ठरत असल्याने नागरिक संताप व्यक्त करीत आहेत. येथील रस्त्यांचे बांधकाम झालेले नसल्याने गटार देखील बांधण्यात आलेली नाहीत. संपूर्ण सांडपाणी रस्त्यावर येते. त्यामध्ये पावसाच्या पाण्याने भर घातली असून रस्त्यावर सर्व दूर गटार तुंबले आहेत. परिणामी येथे घाणीचे साम्राज्य पसरल्याने नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. केवळ सत्ता उपभोगणाऱ्या ग्रामपंचायतीने वृंदावन नगरातील रस्त्यांकडे जाणीवपूर्वक लक्ष द्यावे अशी मागणी जोर धरू लागली आहे.