spot_img
spot_img

दुःखद बातमी | भावपूर्ण श्रद्धांजली

बुलडाणा (हॅलो बुलडाणा) बुलढाणा अर्बन बँकेचे अधिकारी संजय कुलकर्णी यांचे वडील, सुप्रसिद्ध श्रीराम भक्त, श्रीदत्त महाराज म्हणून परिचित श्री प्रभाकर उपाख्य बाळासाहेब कुलकर्णी (सेवानिवृत्त अधीक्षक, पाटबंधारे विभाग) यांचे आज सकाळी दीर्घ आजाराने दुःखद निधन झाले. ते ८७ वर्षांचे होते. त्यांच्या निधनाने कुलकर्णी कुटुंबावर तसेच सामाजिक, धार्मिक क्षेत्रात शोककळा पसरली आहे.

श्री प्रभाकर कुलकर्णी हे शिस्तप्रिय, कर्तव्यनिष्ठ आणि प्रामाणिक अधिकारी म्हणून ओळखले जात होते. पाटबंधारे विभागात प्रदीर्घ सेवा बजावताना त्यांनी अनेक प्रकल्प यशस्वीरीत्या राबवले. सेवानिवृत्तीनंतरही सामाजिक कार्य, धार्मिक उपासना आणि रामभक्तीमध्ये ते सातत्याने सक्रिय होते. “श्रीराम जय राम जय जय राम” हा त्यांच्या जीवनाचा अविभाज्य भाग होता. त्यांच्या सुसंस्कृत वागणुकीमुळे ते सर्वांच्या मनात आदराचे स्थान मिळवून होते.त्यांच्या मोठा परिवार आहे. अंत्यविधी उद्या दिनांक २४ डिसेंबर 2025 रोजी सकाळी १० वाजता जुनी स्मशानभूमी येथे पार पडणार आहे.

ईश्वर त्यांच्या आत्म्यास शांती देवो व कुलकर्णी कुटुंबीयांना हे दुःख सहन करण्याचे बळ देवो, हीच प्रार्थना.

spot_img

Related Articles

लोकप्रिय

error: Content is protected !!