बुलढाणा (हॅलो बुलढाणा) ‘बाईपण भारी देवा’ हे खरंच आहे. परंतु बुलढाण्यात ‘ताईपण’ लयी भारी ठरत आहे. त्या म्हणजे जिल्हा परिषदेच्या सदस्या जयश्री ताई शेळके! लोकसभा निवडणूक पार पडली आणि मतदारांना ताईंची आठवण झाली. परंतु ताई निवडणूक लढल्याच नाहीत. त्यांनी आता तरी विधानसभा निवडणूक लढवावी, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
जिल्हा परिषदेत निवडून गेलेल्या जयश्री ताईंच्या पाठीशी दांडगा अनुभव आहे. त्यांचे कार्यकर्तृत्व कोणीच नाकारू शकत नाहीत. सर्व जाती धर्मांच्या समाज बांधवांना घेऊन चालणाऱ्या ताई आगामी निवडणूक लढणार असल्याची सूत्रांची माहिती आहे. खरे तर, अनेक वर्ष राजकारणात काँग्रेस पक्षामध्ये ताईंनी भरीव कार्य केले. त्यांना प्रदेश कार्यकारणीत स्थान मिळाले. दरम्यान हजारो बेरोजगारांना व महिलांना दिशा महिला बचत गटातून रोजगार उपलब्ध करून दिला. त्यांचे पती चित्रपट निर्माते अभिता कंपनीचे संचालक सुनील शेळके नेहमीच समाजकारणात सक्रिय असतात. अगदी महाराष्ट्रात त्यांचे नाव उमटले आहे. एक महिला काय करू शकते हे जयश्री ताईंनी सिद्ध केले. त्यामुळे बुलढाणा विधानसभेतील मतदार एक सक्षम आणि यशस्वी महिलेला आमदारकीची संधी देण्यासाठी तयार आहेत, असे उघडपणे बोलल्या जात आहे. अलीकडे राजकारण इतके गढूळ झाले आहे की,भारताच्या घटनेत कोणत्याही विधानसभेच्या पुस्तिकेत, कोणत्याच शासकीय नियमांमध्ये आपल्या कोणत्या लोकप्रतिनिधींनी कोणती कामे करायची हे लिहिलेले नाही. ते तसे लिहिलेले नसल्याने आमदार, खासदार, किंवा नगरसेवकांचे मुल्यांकन करता येत नाही. काय करायचे हे निश्चित नसल्यामुळे काहीच केले नाही तरी लोकप्रतिनिधींना आपण जबाबदार धरू शकत नाही.लोकप्रतिनिधीने काय करायचे हे जनतेलाही माहित नसल्यामुळे जनतेला भूलवणे सोपे होते.लोकप्रतिनिधींनी आपापल्या कार्यक्षेत्राबद्दल जनेतेचे प्रश्न मांडणे आणि योग्य ते कायदे बनवणे अपेक्षित असते. कायदा बनवण्यासाठी मतदान करणं हे झालं एक काम. पण या व्यतिरिक्त कोणतेच काम ‘केलेच पाहिजे’ यामध्ये स्पष्टता नाही.लोकप्रतिनिधींना जबाबदार आणि उत्तरदायी हवे असतील तर त्यांच्या कामांमध्ये स्पष्टता असायला हवी. शिवाय विकासात्मक कामे नागरिकांना अपेक्षित असतात. याकरिता सक्षम उमेदवार म्हणून महिला आमदार बुलढाणा विधानसभा क्षेत्रात अत्यावश्यक ठरत असल्याचे मत जाणकार व्यक्त करीत आहेत.